Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस तर काही भागात रिमझिम पावसाची स्थिती पाहायला मिळत आहे. तर आता हवामान विभागाकडून राज्यासाठी मोठा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड आणि पुणे येथील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यामुळे या भागात आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे रत्नागिरी, कोल्हापूर, गोदिंया, चंद्रपूर, नाशिक (Nashik Rain Alert) आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. तसेच भंडार जिल्ह्यासाठी देखील आज यलो अलर्ट जाारी करण्यात आला आहे.
आज कन्या राशीसह ‘या’ राशींवर धनवर्षाव; तुम्हाला लाभ की नुकसान जाणून घ्या-
तर दुसरीकडे राज्यातील अनेक धरणे आता ओव्हर फ्लो झाली असल्याची माहिती समोर आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव दिसण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
