राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! उष्णतेच्या लाटा ओसरणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. […]

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या (IMD Rain Alert) माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या पूर्व क्षेत्रात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस होईल असा अंदाज आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

सावधान! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांतील 96 जिल्ह्यांत येणार उष्णतेच्या लाटा; हवामानाचा विभागाचा इशारा

रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या भागात पावसाची शक्यता असून पुढील 48 तासांत हवामानात बदल होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात 43.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमान प्रचंड वाढले होते. नंदूरबारमध्ये या हंगामातील विक्रमी 46.5 अंश तापमान नोंदवले गेले. यानंतर मात्र पुढील 48 तासांत विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. बंगालचा उपसागर तसेच उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभावामुळे तापमानात घट होईल असे सांगण्यात आले.

उष्णतेच्या लाटा ओसरणार

राज्यात काही ठिकाणी तापमानात प्रचंड वाढली आहे. सलग तीन दिवस प्रचंड उष्णता सहन केल्यानंतर गुरुवारी तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले. परंतु, ही घट क्षणिक होती. पुढील तीन दिवसांत पु्ण्यातील तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनो, राज्यात संथ गतीनं मान्सूनची सुरुवात पण…, स्कायमेटचा पहिला अंदाज

Exit mobile version