Download App

सावधान! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अन् ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत असतानाच अचानक हवामानात (Maharashtra Rain) बदल झाला आहे. मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. तसेच दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान झाले आहे. यामुळे उष्णता कमी झाली आहे. पुढील पाच दिवस असेच हवामान राहणार आहे. याशिवाय काही जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची भीती आहे. हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे याची माहिती घेऊ..

हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 ते 3 तारखेपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत उद्या (बुधवार) पाऊस होईल असा अंदाज आहे. या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट मिळाला आहे.

जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांत उद्या जोरदार पाऊस होईल. या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, पुण्यातील घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना 1 आणि 2 एप्रिल या दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट तर सातारा जिल्ह्यात उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा अंदाज काय?

बीड जिल्ह्यासाठी 3 आणि 4 एप्रिल, नांदेडसाठी 4 एप्रिल, लातूर, धाराशिव जिल्ह्यांसाठी 3 व 4 एप्रिल, अकोला आणि अमरावतीत पुढील दोन दिवस, भंडारा जिल्ह्यात 2 ते 4 एप्रिलपर्यंत, बुलढाणा आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्वच ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सावधान, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

follow us