दिवाळीला पावसाचा धमाका! 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना…

हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला, उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.

Maharashtra Weather Update (1)

Maharashtra Weather Update (1)

Maharashtra Weather Update Rain Alert : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे, पण मान्सूनचा मुक्काम वाढल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे ऐन उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील हवामानाचा आढावा

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीसह कोकण, (Maharashtra Weather Update) पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता (Rain Alert) आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, पालघर आणि ठाणे याठिकाणी हलका पावसाचा इशारा (Heavy Rainfall) आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, घाटमाथा परिसर या भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये ढगगडगडाटासह हलक्या सरी पडू शकतात.

कोरडे आणि उष्ण हवामान

विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहणार आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे; अहिल्यानगरसाठी यलो अलर्ट जाहीर. धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली येथे कोरडे वातावरण असेल; तर नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट असलेले जिल्हे

हवामान विभागाने खालील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव. सर्वसामान्य नागरिकांनी या काळात सतर्क राहावे आणि आवश्यक काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने आवाहन केले आहे. मान्सूनच्या परतीमुळे वातावरणात अचानक बदल होऊ शकतो, त्यामुळे घराबाहेर जाण्यापूर्वी हवामानाची माहिती तपासणे गरजेचे आहे.

Exit mobile version