Mahavikas Aghadi : कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात आता निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. महाविकास आघाडीकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. निवडणुकीची रणनीती आखण्याबाबत ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरु झालंय, जागावाटपांचं गणित नेमकं कसं असणार? याबाबत अद्याप कुठल्याही नेत्याने अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही, पण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून दाव्यांवर दावा केला जात आहे.
नितीश कुमारांच्या भेटीनंतर अरविंद केजरीवाल पवार-ठाकरेंच्या भेटीला, करणार ‘ही’ मागणी…
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अजित पवार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात चांगलेच खटके उडत असल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लोकसभेच्या 18 जागांवर दावा ठोकला आहे. याचं कारण म्हणजे 2019 साली जेव्हा शिवसेना-भाजप युतीने निवडणुका लढविल्या तेव्हा ठाकरे गटाने 18 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता तेच समीकरण डोळ्यासमोर ठेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून जागांवर दावा केला जात असल्याचं बोललं जातंय.
सतीश जारकीहोळी यांनी बुद्ध, बसव, आंबेडकरांना स्मरून घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
तर दुसरकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दाव्यांना प्रतिउत्तर देण्यात आलंय. आधी आमच्या कमी असायच्या म्हणून आम्ही लहान भावाची भूमिका घेत होतो, पण आम्ही मोठे भाऊ झालो आहोत, काँग्रेस 44 तर आम्ही 54 असल्याचं विधान विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलं आहे. आता जागा वाटपांच्या मुद्द्यावर काँग्रेसनेही उडी घेत आम्ही जेव्हा मोठे भाऊ होतो, तेव्हा आम्ही कोणाला सांगितलं नाही. सर्वांना सोबत घेऊन जायची आमची परंपरा असून कुणीही गर्व करु नये, करत असतील तर तो त्यांचा अधिकार असल्याचं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलंय.
पंकजाताईंना डावलून धनुभाऊंची अंधारेंसाठी बॅटिंग; म्हणाले, ताईसाठी जागा…
दरम्यान, एकंदरीत सध्या महाविकास आघाडीमध्ये जागांवाटपांच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवारांनी आपली भूमिका मांडत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तर दुसरीकडे कोण लहान भाऊ, मोठा भाऊ, म्हणत असतील तर आम्ही डीएनए टेस्ट करु, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे.
आधीच्या काळात संजय राऊतांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत संघर्ष व्हायचा आता अजित पवारांच्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये जागांवाटपांच्या मुद्द्यावरुन बिघाडी होण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ‘मिशन 151’ चा नारा भाजपकडून देण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी टिकणार की नाही? भाजपविरोधात विरोधकांची सूर एकत्र असणार का? महाविकास आघाडीची वज्रमूठ भाजपला पराभूत करणार काय? यांसह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या सध्या तरी गुलदस्त्यातच असली तर पुढील काळात निवडणुकांमध्ये राजकीय परिस्थिती काय असेल हे स्पष्ट होणार.