सतीश जारकीहोळी यांनी बुद्ध, बसव, आंबेडकरांना स्मरून घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

सतीश जारकीहोळी यांनी बुद्ध, बसव, आंबेडकरांना स्मरून घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

Satish Jarkiholi took ministerial oath remembering Buddha, Basav, Ambedkar : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करुन धुव्वा उडवला. या विजयानंतर काल कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अनेक आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणारे सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) हे अचानक चर्चेत आले. या चर्चेत कारण ठरला त्यांचा आगळा-वेगळा शपथविधी.

हिंदू धर्मात अशुभ मानल्या जाणाऱ्या ‘राहू’ काळात उमेदवारी अर्ज भरून चौथ्यांदा आमदार बनलेल्या सतीश जारकीहोळी यांनी गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करुन ‘कर्नाटकच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांनी त्यांना शपथ दिली.

बेळगाव जिल्ह्यातील अठरापैकी तब्बल ११ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. यातील यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना अपेक्षेप्रमाणे पहिल्या टप्प्यातच कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi : नवीन संसद भवनाचे उद्घाटन मोदींनी नाही तर राष्ट्रपतींनी करावे

समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील असताना अनेक पुढारी बुवा-बाबांच्या नादी लागलेले पदोपदी पाहायला मिळतात. मात्र, आपण त्याला अपवाद असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

मानव, बंधुत्व वेदिके या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील सीमाभागातील ते बिनीचे कार्यकर्ते आहेत. दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम स्मशानभूमीत घेऊन भयमुक्त समाजनिर्मितीसाठी ते प्रयत्न करतात.

बारावीपर्यंत शिकलेले सतीश हे सुरुवातीला धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते होते. ‘जद’ तर्फे दोनदा विधान परिषदेवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या
पुनर्रचनेत यमकनमर्डी मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित या मतदारसंघात ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत एकाही गावात प्रचाराला न जातादेखील ते निवडून आले होते. यापूर्वी त्यांनी उत्पादन शुल्क व लघुउद्योग खात्याच्या मंत्रिपदासह बेळगावच्या पालकमंत्री पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती.

जारकीहोळी यांचे तिन्ही भाऊ आमदार
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे सख्खे भाऊ माजी मंत्री रमेश हे गोकाक मधून, तर भालचंद्र हे ‘आरभावी मधून निवडून आले असून, लखन हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. परंतु, हे तिघेही भाजप मध्ये असून, एकमेव सतीश हे काँग्रेसमध्ये आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube