महाविकास आघाडीला मिळणार चौथा पार्टनर? : अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर

महाविकास आघाडीला मिळणार चौथा पार्टनर? : अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात विरोधी पक्षांकडून भाजपविरोधात मोठी ताकद उभी केली जात असतानाच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या भेटीसाठी येणार आहेत. येत्या 24 आणि 25 मे रोजी मुख्यमंत्री केजरीवाल मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. 24 मे रोजी उद्धव ठाकरे यांची तर 25 मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. अरविंद केजरीवाल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाणं आला आहे.

2 हजारांची नोट काळा… नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाण बोलले

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीतल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा देण्यात यावा, यासाठीच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येत असल्याचं वृत्त एएनआयने दिले आहे. आजच्या दिवशी केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर लगेचच आता महाराष्ट्रात पवार आणि ठाकरेंची भेट घेण्यासाठी येत आहेत.

‘माथाडी चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न, त्याविरुद्ध उभे राहा’; पवारांनी कष्टकऱ्यांना दिलं बळ

दिल्लीत सरकार आणि केंद्र सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्यांवरुन संघर्ष पेटला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने नूकताच निकाल दिला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने एक नवा अध्यादेश आणला आहे.

भारत क्वाड शिखर सम्मेलनाचे यजमानपद भूषवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पलटवण्यासाठी नवीन अध्यादेश आणणार असल्याचा आरोपच केजरीवालांनी केला होता. यासंदर्भातील ट्विटच अरविंद केजरीवालांनी शुक्रवारी केलं होतं. त्यानंतरच लगेचच राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण निर्माण करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी एक नवा अध्यादेश दिल्ली सरकारने आणलाय.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या अध्यादेशाविरोधात विरोधकांकडून पाठिंबा मिळावा, यासाठी केजरीवाल महाराष्ट्रात येत असून राज्यातील दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube