छ. संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या आजच्या सभेत काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी दांडी मारली असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेसाठी महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांचे नेते उपस्थित झाले आहेत. नाना पटोले यांनी प्रकृती अत्यवस्थ असल्याचं कारण दिल्याची माहिती आहे. मात्र, सभेला पटोले आले नसल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.
Vasant More यांची मध्यस्थी : अन् एका तासात प्रकरण मिटले…
नूकतीच महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु झाली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वीच सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं होतं. तेव्हाही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना डावलल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.
साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले
टीझरच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. या व्हिडिओमध्ये जरी राहुल गांधींचा फोटो नसला तरी आम्ही सोनिया गांधी यांचा फोटो घेतला आहे. पुढील सभांच्या टीझरमध्ये राहुल गांधींचा फोटो दिसणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले होते. दरम्यान, सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचंही समोर येतंय. सावरकरांवर राहुल गांधींनी भाष्य केल्याने ठाकरे गटासह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राहुल गांधींचे कान टोचण्यात आले होते.
एवढंच नाहीतर काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला ठाकरे गटाच्या नेत्यांनी गैरहजेरी लावली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली की काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीतही शरद पवार यांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. सावरकरांनी माफीवीर म्हणणं योग्य नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं होतं.
नयनज्योती सैकिया ठरला ‘MasterChef India’चा विजेता; ट्रॉफी- रोख रक्कमेसह जिंकली प्रेक्षकांची मने
या संपूर्ण घडामोडीनंतर आजच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नाना पटोलेंनी दांडी मारल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता नाना पटोले सभेसाठी का नाही आले? महाविकास आघाडीत काही धूसफुस सुरु आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.