Saraswat Bank Recruitment : सारस्वत बँकेत 150 पदांसाठी होणार भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Untitled Design   2023 04 01T193748.464

मागील गेल्या काही दिवसांपासून सरकारी विभागासह खाजगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पदभरती केली जात आहे. त्यामुळं बेरोजगार असलेल्या तरुण-तरुणांना नोकरी मिळण्यासाठी अनेक मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. अगदी बॅंकींग क्षेत्रातही नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. तुम्ही देखील बॅंकींग क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅंकेने (Saraswat Co-operative Bank) मोठ्या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या भरती अंतर्गत लिपीक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्यामुळं बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 8 एप्रिल 2023 आहे. सारस्वत बॅंकेच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे http://www.saraswatbank.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन रितीने अर्ज करू शकतात.

एकूण पदे – 150

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी (मार्केटींग आणि ऑपरेशन्स)

शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.

अनुभव
बॅंक किंवा इंन्शूरन्स कंपनीतील किमान 1 वर्षाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 01 मार्च 2023 पर्यंत 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही; शरद पवारांचं वक्तव्य

नोकरीचे ठिकाण
मुंबई आणि पुणे

जाहिरात
https://www.saraswatbank.com/Assets/JO%20RECRUITMENT.pdf

अर्ज
https://www.saraswatbank.com/TR/Recruitment.aspx

अर्ज कसा करावा
http://www.saraswatbank.com या संकेतस्थळावर जा
त्यानंतर करिअर हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
आता तुम्हाला अर्ज दिसेल, त्यावर क्लिक करा आणि अर्ज भरा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट घ्या.
त्यानंतर बॅंकेचं संकेतस्थळ वेळोवेळी चेक करत राहा, जेणेकरून या भरतीविषयीचे पुढील अपडेट तुम्हाला वेळेवर मिळती.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2023

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube