सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही; शरद पवारांचं वक्तव्य

सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही; शरद पवारांचं वक्तव्य

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. राहुल गांधींनी लंडन दौऱ्यादरम्यान, केलेल्या विधानांवर भाजपने जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर माफी मागायला मी राहुल गांधी आहे, सावरकर नाही, असं वक्तव्य राहुल यांनी केलं होतं. तर यापूर्वी भारत जोडो यात्रे दरम्यान वीर सावरकर यांच्याविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळंही देशासह राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं होतं. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही, असं त्यांनी एका कार्यक्रमात बोलतांना सांगितलं आहे.

शरद पवार हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवारांना विचारण्यात आलं की, सावरकर या विषयावर तुम्ही आणि राहुल गांधी कधी काही बोलले आहात का? त्यावर उत्तर देतांना पवारांनी सांगितलं की, आमच्यात कायम चर्चा होत असते. पवार यांनी सांगितलं की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्याकरती विरोधी पक्षाची एक बैठक काल दिल्लीत झाली. या बैठकित मी सावरकरांचा मुद्दा मांडला आणि सांगितलं की, सावकरकार हा राष्ट्रीय मुद्दा नाही. सावरकरांचा मुद्दा सोडून इतर अनेक विषय आहेत.

विधानसभा निवडणूका लोकसभेसोबत होणार? शरद पवारांनी सांगितला त्यांचा अंदाज

पवार म्हणाले, सावरकरांविषयी द्वेष नाही. कारण, सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी जो त्याग केला तो दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांचं स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान आहे, हे योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. शिवाय, सावरकर हे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे आणि प्रोग्रेसिव्ह विचारांचे होते. गाय ही उपयुक्त पशू आहे. जोपर्यंत तिचा उपयोग होतो, तोपर्यंत तिचा वापर करा, आणि उपयोग होत नसेल तर विकून टाका, असं ते सांगायचे.

दरम्यान, सध्या सावरकर आपल्यात नाही आहेत. त्यामुळे उगाच जुने विषय काढून उगाळण्यात काही अर्थ नाही. आपल्यापुढं आज कितीतरी वेगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्ंनावर काम करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube