Download App

‘मविआ’चा रिव्हर्स गिअर; राम शिंदेंविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव घेतला मागे, कारण काय?

सभापती राम शिंदे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची सूचना मागे घेत असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. 

Maharashtra Politics : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या (Ram Shinde) विरुद्ध महाविकास आघाडीची एकजूट झाली होती. सभागृहात शिंदे पक्षपाती कारभार करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या विरुद्ध अविश्वास आणण्याची तयारी विरोधकांनी केली होती. या संदर्भात पत्रही देण्यात आले होते. परंतु, यात आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. सभापती राम शिंदे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची सूचना मागे घेत असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे.

संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणे आहे. तथापि, महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा सभागृहामध्ये सभापती आणि अध्यक्ष यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. यासंदर्भात राज्यपालांना पत्र देण्यात आले होते.

राहुल नार्वेकर, राम शिंदेंचं कामकाज नियमबाह्य; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, पत्रही दिलं

दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य सभागृहाचे कामकाज चालविले जात आहेत. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना सभागृहात सभापतींकडून बायस वागणूक मिळत आहे. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिले जात नाही. त्यांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी ही बाब आपल्या निदर्शनास आणण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले होते.

दरम्यान, आता हा अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. अंबादास दानवे यांनी तसे पत्रही दिले आहे. यासंदर्भात 21 मार्च रोजी मु्ख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्र्‍यांना आम्हाला समाधानकारकपणे आश्वस्त केले. त्यामुळे सभागृहात खेळीमेळीचे वातावरण रहावे म्हणून आम्ही सभापतींना दूर करण्याबाबत दिलेली प्रस्तावाची सूचना मागे घेत आहोत असे दानवे यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर, एकनाथ खडसे, सुनील शिंदे, प्रज्ञा सातव आदींच्या सह्या आहेत.

घोषणा अन् थापांभोवती फिरणारा अर्थसंकल्प; कवितेतून दानवेंनी काढले वाभाडे

follow us