Download App

मंत्रिपदाची ऑफर होती पण, राष्ट्रवादीनंच नाकारली; फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याकडून एक मंत्रिपद ऑफर करण्यात आलं होतं. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा देण्यात आली होती.

Devendra Fadnavis on Modi Cabinet : लोकसभा निवडणुकीत आज एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर आणखी काही खासदार शपथ घेतील. यासाठी आज सकाळपासूनच भाजपसह एनडीएतील घटकपक्षांच्या खासदारांचे फोन खणखणत आहेत. खासदारांना मंत्रिपदासाठी विचारणा होत आहे. मात्र या सगळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नाव मागे पडलं आहे. कालपर्यंत प्रफुल पटेल यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं. परंतु, आज दिवस उगवल्यानंतर मात्र अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही. यानंतर घडलेल्या घडामोडीतून राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच माध्यमांना माहिती दिली.

राष्ट्रवादीला भोपळा! ना तटकरे, ना पटेल.. मंत्रिपदाच्या हुलकावणीने अजितदादा नाराज?

राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याकडून एक मंत्रिपद ऑफर करण्यात आलं होतं. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा देण्यात आली होती. परंतु, त्यांचा असा आग्रह होता की प्रफुल पटेल यांचं नाव आम्ही फायनल केलं आहे. ते आधी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे आम्हाला त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही. परंतु, युतीचं ज्यावेळी सरकार असतं तेव्हा काही निकष तयार करावे लागतात. हे निकष मोडता येत नाहीत. त्यामुळे भविष्यात आम्ही त्यांचा विचार नक्की करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे. भाजपाच्या 63 जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे बहुमत दूरच राहिले फक्त 240 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एनडीए आघाडीचं बहुमत मात्र झालं आहे. आघाडीतील घटक पक्षांनी समर्थनाचं पत्रही देऊन टाकलं आहे. अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रविवारी मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आणखीही काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातील काही खासदारांची नावं समोर आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचं नाव निश्चित झालं होतं. दिल्लीत महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे उपस्थित होते.

PM Modi Oath Ceremony : आठ हजार विशेष अतिथी, स्वादिष्ट मेजवानी… असा पार पडणार मोदींचा शपथविधी

परंतु, आज सकाळपासून मात्र चित्र बदललं आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल या दोघांपैकी एकालाही फोन आलेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रिपद हवं होतं. परंतु, एकच खासदार असल्याने कॅबिनेट मंत्रिपद देता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. मात्र, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दोन्ही ज्येष्ठ खासदार आहेत. पटेल तर याआधी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कुणालाच राज्यमंत्री करता येणं शक्य नाही. सध्या आम्ही थांबतो मंत्रिमंडळ विस्तारावेळी कॅबिनेट मंत्रिपद द्या असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितल्याची माहिती आहे.

follow us