मुंबई : रायपूरचे काँग्रेसच्या अधिवेशनानंत राज्यात संघटनात्मक बदल होणार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांनी संवाद साधल्यानंतर चव्हाण यांनी सध्या काँग्रसेमध्ये सुरु असलेल्या गटबाजीच्या राजकारणावरुन विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.
चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये सुरु असलेले वाद हे मोठे असल्याचं मला वाटत नाही. पक्षाच्या लोकांनी जाहीरपणे वक्तव्य करणं टाळलं पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी बोलताना दिला आहे. तसेच ते म्हणाले, एकाच पक्षामध्ये काम करीत असताना सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांशी समन्वय साधायला हवा, काँग्रेस पक्षाची हक्काची जागा गमावल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
शीतल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंनाही सोडलं नाही…
मागील काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेस कमिटीमधील अंतर्गत गटबाजी आणि वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातील निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचा वाद चांगलाच उफाळला आहे.
Radhakrishna Vikhe आता वाळू लिलाव कायमस्वरूपी बंद होणार! महसूल मंत्र्यांची घोषणा
खरंतर हा वाद सुरु झाला तो काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या पुत्र आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधरमधून आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर. एवढंच नाही तर या निवडणुकीत सत्यजित तांबे निवडून देखील आले आहेत. निवडून आल्यानंतर तांबे यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केल्याचं दिसून आलं होतं. तर दुसरीकडे हे सर्व सुरु असतानाच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होते.
काय सांगता! सुनेला थेट हेलिकॉप्टरने आणलं सासरी…
शस्त्रक्रियेनंतर थोरातांनीही काँग्रेस पक्षाविषयी नाराजी व्यक्त करीत त्यांनी आपला विधीमंडळाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. याउलट ते म्हणाले की, नाना पटोलेंसोबत मी काम करणार नाही. थोरातांच्या या राजीनाम्यानंतर काँग्रेसची ही गटबाची उफाळून आल्याचं दिसून आलंय.
दरम्यान, अखेर रायपूर काँग्रेसच्या अधिवेशनानंतर राज्यात संघटनात्मक मोठे बदल होणार असल्याचं सूचक विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नेमके कोणते संघटनात्मक बदल होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.