काय सांगता! सुनेला थेट हेलिकॉप्टरने आणलं सासरी…

काय सांगता! सुनेला थेट हेलिकॉप्टरने आणलं सासरी…

जळगाव : हौसेला मोल नसतं, असं म्हणतात आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला लोकं तयार असतात. जिल्ह्यातील अमळनेर येथील बिल्डर सरजू गोकलानी यांचा मुलगा आशिष याचे आज गुरुवारी लग्न आहे. सून सिमरन हिला पुण्याहून अमळनेरात येण्यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती.

वधूला सासरी आणण्यासाठी वरपित्याने थेट हेलिकॉप्टरने प्रवास करत अमळनेरला आणलं आहे. या फंड्याची चर्चा सध्या जिल्ह्यासह राज्यात चांगलीच रंगली आहे. जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असणारे बिल्डर सरजू गोकलाणी यांचा मुलगा आशिष गोकलाणी यांचं अहमदनगरचे उद्योजक चंदानी यांची कन्या सिमरन चंदाशी यांच्याशी आज विवाह पार पडणार आहे.

अध्यक्षपद भूषविताना मला.., P. T. Usha यांनी पाहिलं राज्यसभेच्या अध्यक्षाचं कामकाज

मात्र, यासाठी आशिष गोकलाणी यांनी वेगळाच फंडा वापरला आहे. अखेर हौसेला मौल नसतं हेच खरंय, आशिष यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला हेलिकॉप्टरमधून जळगावला आणलं आहे. यावेळी बिल्डर सरजू गोकलाणी यांनी मोठ्या थाटात सूनेचं स्वागत केलं आहे.

Pathan : यशराज फिल्म्सचा पठान दुसऱ्या बुधवारीही ठरला रॉक-स्टेडी

या हौशी वधू-वरांचं हेलिकॉप्टर जळगावात पोहचल्यानंतर सिमरनचे सासरे सरजू गोकलाणी यांनी हेलिपॅडवर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करत या नव वधू आणि वराचं स्वागत मोठ्या थाटात केलं आहे. या हौशी वरपित्याने सूनेला जळगावला आणण्यासाठी पुण्यावरुन थेट अहमदनगरला हेलिकॉप्टर पाठवलंय. अहमदनगरहुन वधूला घेऊन हे हेलिकॉप्लट थेट अंमळनेरला दाखल झालं आहे.

मला घेण्यासाठी हेलिकॉप्टर येणार असल्याचं मी फक्त ऐकलं होतं, मी कधी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. मात्र, सासरकडून एवढं छान माझं स्वागत केल्याने मला खूप छान वाटतं असल्याची प्रतिक्रिया वधू सिमरन यांनी दिली आहे.

‘…शिवसैनिकांचा हिसका दाखवला जाईल ; शरद कोळींचा इशारा 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जळगावातीलच एका भावाने आपल्या बहिणीला आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टर घेऊन आल्याची सुखद घटना घडली आहे. तसेच करमाळ्यातील कंदरमधील एका शेतकऱ्यांने आपल्या मुलीला लग्नस्थळी पाठवण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बोलवलं होतं. त्यानंतर आता जळगावात आपल्या सुनेला थेट हेलिकॉप्टरने सासरी आणल्याचं समोर आलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube