अध्यक्षपद भूषविताना मला.., P. T. Usha यांनी पाहिलं राज्यसभेच्या अध्यक्षाचं कामकाज

अध्यक्षपद भूषविताना मला.., P. T. Usha यांनी पाहिलं राज्यसभेच्या अध्यक्षाचं कामकाज

नवी दिल्ली : धावपट्टू पिलावुल्लाकांडी थेक्केपारंबिल उषा उर्फ पी. टी. उषा यांनी आज गुरुवारी राज्यसभेचे अध्यक्ष व उपसभापती जगदीप धनखर यांच्या अनुपस्थितीत कामकाज पाहिलं आहे. पीटी उषा यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे.

कामकाजाच्या क्षणाची एक व्हिडिओ क्लिप देखील पीटी उषा यांनी शेअर केली आहे. पीटी उषा ट्विटमध्ये म्हणाल्या, फ्रँकलिन डी. रुझवेल्ट म्हणाले की, मोठ्या शक्तीने मोठी जबाबदारी येते, राज्यसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवताना मला याची जाणीव झाली. मला आशा आहे की, मी हा प्रवास माझ्यावर ठेवू शकेन, लोकांद्वारे माझ्यावर ठेवलेला विश्वास पूर्ण करत राहीन, असं ट्विट त्यांनी केलंय.

पीटी उषा यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांचे समर्थक आणि अनुयायांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका यूजरने लिहिले की, “उषा, तुझा खूप अभिमान आहे, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Maharashtra Politics नेत्यांच्या गाड्यांचे अपघात सत्र संपेना!… शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले!

पुढे जा आणि पुन्हा इतिहास घडवा.” त्याचवेळी आणखी एकाने म्हटले की, मला खूप अभिमान आहे, तू भारतीय महिलांसाठी प्रेरणा आहेस. तर तिसऱ्या युजरने “तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा, आशा आहे की तुम्ही खूप आनंदी असाल.” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

राम शिंदे यांची नामांतराची ‘गुगली’ ; रोहित पवार यांचा ‘सेफ’ खेळ

दरम्यान, डिसेंबरमध्ये, पीटी उषा राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचा भाग असलेल्या पहिल्या नामनिर्देशित खासदार बनल्या होत्या. सभापती आणि उपसभापतींच्या अनुपस्थितीत त्या सभागृहाचे कामकाज चालवणार आहेत.

पीटी उषा यांना जुलै 2022 मध्ये भारतीय जनता पक्षाने वरिष्ठ सभागृहासाठी नामनिर्देशित केले होते. नोव्हेंबरमध्ये त्यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षपदी निवड झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube