शीतल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंनाही सोडलं नाही…
ठाणे : सकाळी दहा वाजता भोंगा वाजतो, आता तो रात्री सुद्धा वाजायला लागला, असल्याचा टोला शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खासदार संजय राऊतांना लगावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमानिमित्त त्या ठाण्यात आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
म्हात्रे म्हणाल्या, आता कोळी समाज पेटून उठला आहे, वरळीतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी कमी नव्हती, एका विशिष्ट पध्दतीने व्हिडिओ दाखवले गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
Radhakrishna Vikhe आता वाळू लिलाव कायमस्वरूपी बंद होणार! महसूल मंत्र्यांची घोषणा
तसेच पुढे बोलताना त्यांनी वरळी मतदारसंघावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. तुम्ही म्हणता वरळी तुमचा बालेकिल्ला आहे, पण वरळीत सध्या काय सुरु आहे याची तुम्हांला कल्पना नाही. वर्षा बंगल्यावर आलेली गर्दी ही आम्ही जमवलेली नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आलेले हे लोकं आहेत.
राज्यात पुन्हा मोठा धमाका होणार, बच्चू कडूंचा नवा दावा !
दोन आमदारांचा बळी देऊन तुम्ही वरळीत आमदारकी मिळवली आहे. तुमचं जिथं वास्तव्य आहे तिथे बांद्रामधून का नाही निवडणूक लढवलीत, असा सवालही त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना नाव न घेता केला आहे.
अडीच वर्ष तुमचा मतदारसंघातील हा समाज वडवळ फिरत होता त्यांचं तुम्ही कधीही ऐकून घेतलेलं नाही. अडीच वर्षांच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना भेटू दिलं जात नसल्याचाही आरोप त्यांनी नाव न घेता केला आहे.
दरम्यान, आता ज्या लोकांना तुम्ही भेटत नव्हता त्यांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावले असून आता हा कोळी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
नूकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीत सभा पार पडली. या सभेत कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून आलं.
त्यानंतर शिवसंवाद यात्रेवर असलेले आदित्य ठाकरे यांनीही वरळीच्या सभेवरुन रिकाम्या खुर्च्यांसमोर मुख्यमंत्री बोलत असल्याचा टोला लगावला होता. त्यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह उध्दव ठाकरेंवरही निशाणा साधणं सोडलेल नसल्याचं दिसून आलंय.