Orders To Catch Mohan Bhagwat Claims Former ATS Officer Mehboob Mujawar : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची काल (दि.31) निर्देष सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी ATS अधिकाऱ्याने केलेल्या धक्कादायक दाव्यांनी खळबळ उडाली आहे. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे आणि ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून जिवंत दाखवण्यात आलं होते. ते मृत असूनही मला त्यांचे ठिकाण शोधण्याचे आदेश देण्यात आले होते, असा धक्कादायक दावा मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर माजी ATS अधिकाऱ्याने केला आहे. मेहबूब मुजावर असे धक्कादायक दावे करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. न्यायालयाच्या निर्णयाने एटीएसने केलेले “बनावट काम” रद्दबातल ठरले आहे असे ते म्हणाले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? प्रकाश आंबेडकर संतापले
मुजावार यांचे दावे नेमके काय?
मालेगाव निकालानंतर बोलताना मुजावार म्हणाले की, भगवा दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी मला या प्रकरणात समाविष्ट करण्यात आले होते. तसेच हे सिद्ध करण्यासाठी मला भागवत यांना अटक करण्याचे थेट निर्देश देण्यात आले होते. पण, भगवा दहशतवादाचा सिद्धांत खोटा होता असेही मुजावार यांनी म्हटले आहे. हे आदेश तत्कालीन मालेगाव स्फोटाचे मुख्य तपास अधिकारी परमबीर सिंग आणि त्यांच्या वरिष्ठांनी दिले होते असा दावाही मुजावार यांनी केला आहे. भागवत आणि इतर निष्पाप लोकांना या प्रकरणात अडकवणे, हा सरकार आणि एजन्सींचा उद्देश होता असेही ते म्हणाले.
Solapur, Maharashtra: Former ATS officer Mehboob Mujawar on 2008 Malegaon blast case says, "Whatever I said about Mohan Bhagwat or about my investigation was all under the orders of Param Bir Singh and even higher authorities. According to their instructions, I was provided with… pic.twitter.com/Ztx5hszU7h
— IANS (@ians_india) August 1, 2025
एक विधान अन् राजकारणातून पत्ता कट! साध्वी प्रज्ञा यांची राजकीय कारकीर्द कशी संपली? A टू Z स्टोरी…
सुशीलकुमार शिंदेंबाबतही केले दावे
भागवतांच्या अटकेबाबत बोलल्यानंतर मुजावार यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादासारखा सिद्धांत खरोखर होता का?, हे पुढे येऊन सांगावं. या संपूर्ण प्रकरणात ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून जिवंत दाखवण्यात आलं होते. हे दोघेही मृत असूनही मला त्यांचे ठिकाण शोधण्याचे आदेश देण्यात आले होते. या गोष्टी करण्यात नकार दिल्याने माझ्यावर खोटे आरोप करत खटले लादण्यात आले. पण, या सर्व आरोपांमधून मी निर्दोष सिद्ध झालो असेही मुजावर यांनी म्हटले आहे.
शाहंनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लोकसभेत एक दिवस आधीच सांगितला होता; वाचा काय म्हणाले होते शाह
माझी 40 वर्षांची कारकीर्द उद्ध्वस्त झाली
मला राम कलसांगरा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांसारख्या व्यक्तिमत्त्वांबद्दल काही गोपनीय आदेश देण्यात आले होते. हे सर्व आदेश असे नव्हते की कोणीही त्यांचे पालन करू शकेल असेही त्यांनी नमूद केलं. मी आदेशांचं पालन केलं नाही, म्हणूनच माझ्यावर खोटा खटला दाखल करण्यात आला आणि त्यामुळे माझी 40 वर्षांची कारकीर्द उद्ध्वस्त झाली असा आरोपही त्यांनी केला.