Manisha Havaldar from NEET PaperLeak solved the mystery of saved number in the name of ‘God’ in mobile : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एनटीएच्या फिजिक्स विषयाच्या पॅनलवरील तज्ज्ञ मनीषा हवालदार हिला पुण्यात अटक केल्यानंतर तपासाला वेग आला आहे. फॉरेन्सिक तपासात तिच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेला नंबर संशयाच्या भोवऱ्यात आला असून, तो तेजस शहा नावाच्या विद्यार्थ्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुण्यात 26 मेपासून 14 दिवस जमावबंदी; आंदोलन-मोर्चांवर बंदी, इंधन बचतीसाठी मनपाचे कठोर आदेश
22 मे रोजी सीबीआयने सदाशिव पेठेतील घरावर छापा टाकून मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि नीट प्रश्नपत्रिकेच्या प्रती जप्त केल्या. मोबाईलमध्ये ‘गॉड’ आणि ‘डॉ. उषा’ या नावाने सेव्ह असलेल्या संपर्कांशी झालेले संभाषण तपासाच्या केंद्रस्थानी आहे. तपासानुसार, पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवणे आणि पैशांची देवाणघेवाण तेजस शहाच्या माध्यमातून होत होती.
अभिनेता आदिनाथ कोठारेच्या “सिस्टम” चित्रपटाच्या कास्टिंगची फिल्मी गोष्ट…
चौकशीची माहिती मिळताच मनीषा हवालदारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. तिने फिजिक्स विषयाच्या हस्तलिखित नोट्स जाळल्या, तसेच सहआरोपी आणि बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सॲप चॅट आणि मेसेजेस डिलीट केले. स्वतःच्या मोबाईलसोबतच पतीच्या फोनचाही वापर प्रश्न पाठवण्यासाठी केल्याचा संशय आहे.
ऐतिहासिक दिल्ली जिमखाना क्लबला परिसर रिकामा करण्याचे आदेश, सरकारला का हवाय क्लब?
आता सीबीआय सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हे डिजिटल पुरावे पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तपासादरम्यान घरातून 1 लाख 1 हजार 930 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आर्थिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवल्याची कबुलीही मनीषा हवालदारने दिल्याची माहिती आहे.
ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईडचा स्फोट; 4 जण जखमी
दरम्यान, या प्रकरणात एनटीएच्या रसायनशास्त्र विषयाच्या एका महिला तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिकाही संशयाखाली आली आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, प्रिंटिंग आणि डिजिटल ट्रान्सफर प्रक्रियेदरम्यान गळती झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. पुणे, लातूर आणि राजस्थानपर्यंत तपासाचा विस्तार करण्यात आला आहे.
