Manoj Jarange Criticize Radhakrishan Vikhe Patil on Reservation : मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishan Vikhe Patil) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange ) म्हणजे मराठा समाज नाही. अशी टीका केल्यानंतर जरांगे यांनी विखे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे म्हणाले, विखे पाटील कधीतरी जातीकडून बोला. तुमच्या नगर जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे माजी आमदार देखील इकडे येऊन बोलत आहेत. त्यामुळे मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणं बंद करा. तुमच्यामुळे जात मरेल. अजूनही हातातून वेळ गेलेली नाही. शहाणे व्हा. असं जरांगे म्हणाले.
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीने आसाम फिल्म फेडरेशन रंगोली महोत्सवात इंडियाटूर विषयी थेटच सांगितलं
पुढे मनोज जरांगे म्हणाले की, मी म्हणजे मराठा समाज नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील कळेल की, आंदोलन का भरकटले? तसेच मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागितलं आहे. 1884 च्या सरकारी नोंदी महत्त्वाच्या आहेत. ना की 1990 ला दिलेलं विना नोंदणीचं आरक्षण. याचे उत्तर मराठा समाजाला द्या.
मोठी बातमी : केजरीवालांना ‘सुप्रीम’ झटका; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत मुक्काम तुरूंगातच
विखे साहेब तुम्ही संविधानिक पदावर असून मंत्री आहात. 1967 ला दिलेल्या आरक्षण वाचून पाहा. ज्यामध्ये कुणबी कुणबींचा समावेश आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. तसेच 2004 ला तुम्ही देखील सरकारमध्ये होता. त्यावेळी सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा आणि कुणबी एकच असल्याचा कायदा केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मराठा कुणबी आहे. हे मी चुकीचं बोलत नाही.
वसुंधरा राजेंच्या वक्तव्याची देशभर चर्चा; म्हणाल्या, जे बोट धरून मोठे झाले, चालायला शिकले, तेच बोट…
तुम्ही जर मराठा आंदोलन भरकटलं असं म्हणत असाल तर ओबीसी आंदोलन भरकटले नाही का? ज्यामध्ये सगळे एकत्र येऊन तलवारी काढण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या तलवारी तुमच्या बंगल्यात येणार नाही. मात्र गोरगरीब मराठ्यांच्या मानेवर भुजबळांची तलवार पडेल. त्यामुळे आंदोलन कोणी भरकटवलं? हे देखील पहा. कधीतरी जातीकडून बोला. तुमच्या नगर जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे माजी आमदार देखील इकडे येऊन बोलत आहेत. हे तुम्हाला दिसत नाही का? मराठ्याच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणं बंद करा. तुमच्यामुळे जात मरेल. अजूनही हातातून वेळ गेलेली नाही. शहाणे व्हा.
मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही…
राधाकृष्ण विखे हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, आरक्षणाबाबत सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रत्येक पातळीवर काम करत आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, या दोन्ही समाजाच्या आरक्षणावर सरकार तोडगा काढेल, असे विखे पाटील म्हणाले.
https://youtu.be/3pVCdgjlM3A?si=Ws34N3EfD_2LNcAx