Radhakrishan Vikhe : आता त्यांना भाजप उमेदवाराचा प्रचार करावाच लागणार; विखेंचा राम शिंदेंना टोला

Radhakrishan Vikhe : आता त्यांना भाजप उमेदवाराचा प्रचार करावाच लागणार; विखेंचा राम शिंदेंना टोला

Radhakrishan Vikhe : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये अहमदनगरमधून सुजय विखेंना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishan Vikhe ) यांनी राम शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. विखे म्हणाले की, आता भाजपच्या नेत्यांना भाजप उमेदवारांचा प्रचार करावाच लागेल.

Ravindra Dhangekar : …पण पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय मोदींचा नाही; धंगेकरांचा मोहोळ यांना टोला

राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी नाराजीमुळे शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पण कोण कोणाबद्दल नाराजी व्यक्त करतोय मी त्याला काही करू शकत नाही. याबाबत अजितदादांना माहिती असेल. असे यावेळी बोलताना विखे मंत्री म्हणाले. तसेच भाजप कडून आता उमेदवारी जाहीर झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांना भाजप उमेदवारांचा प्रचार करावाच लागेल. अशा शब्दांत एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राम शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

New EV Policy : भारतात टेस्लाची एन्ट्री फिक्स; मोदी सरकारनं जाहीर केली नवी EV पॉलिसी

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके व भाजपचे आमदार राम शिंदे हे एकत्र फिरत होते. यातच शिंदे विरुद्ध विखे असे शीतयुद्ध सुरूच आहे लोकसभेची यादी जाहीर झाली असून यामध्ये सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तर यामध्ये राम शिंदे यांना डावलण्यात आले आहे. यामुळे असलेला कलह थांबणार का यावरती देखील मंत्री विखे यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.

Pune Loksabha : वसंत मोरेंसाठी आमदार धंगेकर माघार घेणार? धंगेकर म्हणतात…

हा गृहकलह आता थांबलेला आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येकजण इच्छुक असतो. यामध्ये गैर काही नाही. मात्र आता पक्षाकडून उमेदवारी बाबत निर्णय करण्यात आलेला आहे. यामुळे आता जे भाजपचे नेते आहेत. उमेदवारांचे काम करतील असं देखील यावेळी विखे म्हणाले.

जिल्हा नामांतर…

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होऊन अहिल्यादेवी नगर असे करण्यात आले आहे. नुकतेच हा निर्णय घेण्यात आल्या असल्याचं शासनाकडून जारी करण्यात आले. यावरती बोलताना मंत्री विखे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आमदार गोपीचंद पडळकर यांनी या नामांतराचा लढा सुरू ठेवला होता. अखेर जिल्ह्याचे व शहराचे नामांतर हे पूर्ण झाले आहे. आपण जनतेची मागणी पूर्ण करू शकलो. याचे समाधान आहे. असे मंत्री विखे म्हणाले.

विखे विरुद्ध लंके कोण जिंकणार?

भाजपकडून सुजय विखे हे लोकसभेचे उमेदवार जाहीर झाले आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटातून आमदार निलेश लंके हे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. विखे विरुद्ध लंके असा सामना झाल्यास सुजयला जनता निवडून देईल असं वक्तव्य मंत्री विखे यांनी केले. मतदान हे काही सुजयच नाही. तर जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारला मतदान करेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज