Download App

मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचार सुरू…

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज अचानक तब्येत बिघडली.

  • Written By: Last Updated:

संतोष साबळे

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज अचानक तब्येत बिघडली. अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलं आहे. दरम्यान, जरांगेची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

ॲक्शन, ड्रामा… ‘सुभेदार’च्या चित्रीकरणाला सुरुवात! अनिल कपूरच्या लूकने वेधलं लक्ष 

राज्यात विधानसभा निवडणुकांचीणधुमाळी सुरू झाली. तर मनोज जरांगे यांनीही मराठा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतवरणार असं जाहीर केलं होतं. मागील काही दिवसांपासून जरांगे सलग मराठा समाजाच्या बैठका आणि मुलाखती घेत आहेत. 24-24 तास मराठा आंदोलकांची अंतरवालीत गर्दी आहे. शिवाय, विविध पक्षाचे नेतेमंडळी मराठा मतांसाठी सातत्याने जरांगेंची भेट घेत आहे. जरांगेंना भेटण्यासाठी येणारे नेतेमंडळी जरांगेंशी रात्री उशिरापर्यंत चर्चा करतात. त्यामुळं जरांगे यांची झोप होत नाही. परिणामी त्यांची आज अचानक तब्येत बिघडली. जरांगेंनी अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागला. त्याचबरोबर तापही त्यांना आलेला आहे.

माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ शिंदे मात्र..काय म्हणाले फडणवीस? 

सध्या त्यांच्यावर अंतरवली सराटी येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लाईन लावण्यात आलं. त्यांचं रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. सध्या डॉक्टरांनी जरांगे यांची तपासणी करून आराम करायचा सल्ला दिला आहे. जरांगे यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर चावरे आणि त्यांची टीम जरांगे यांच्यावर उपचार करत आहेत.

दरम्यान, अंतरवली सराटीत मनोज जरांगे हे 31 ऑक्टोबरला अंतिम बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर ओबीसींसह सर्व जाती-धर्माच्या लोकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर कोणता उमेदवार, कोणता विधानसभा मतदारसंघ याबाबत सांगितलं जाईल, असं जरांगे म्हणाले.

मराठा, दलित, मुस्लीम समीकरणं जुळलं चतर यातील उमेदवार आमदार, मंत्री झालेले दिसतील, यासाठी एकत्रित येणं गरजेच आहे. एकत्र आले नाही तर हे शक्य होणार नाही, असंही जरांगे म्हणाले.

follow us