माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ शिंदे मात्र..काय म्हणाले फडणवीस?

  • Written By: Published:
माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ शिंदे मात्र..काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis On Amit Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या उतरले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Devendra Fadnavis) अमित ठाकरेंची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे.

अजितदादांनी असं का केलं?, हे तेच  बड्या नेत्याचं काम करण्यावर फडणवीसांचा थेट नकार

या प्रकरणावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भाजपचं आहे. आम्हाला लोकसभेत राज ठाकरेंनी पाठींबा दिला होता. त्यामुळे एका जागेवर ते मदत मागत असतील, तर ती द्यायला हवी, असं आमचं मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मतही वेगळं नाहीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंनीही प्रयत्न केला

मी स्वत: एकनाथ शिंदेंसोबत याविषयावर चर्चा केली. आम्ही चर्चा केली की एखादी जागा हवं तर अदलाबदल करु…एकनाथ शिंदेंनी प्रयत्न देखील केला. त्यावेळी तेथील उमेदवार सदा सरवणकर यांनाही बोलावलं होतं. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी मत मांडली की, आपण जर जागा लढवली नाही, तर ती मत थेट ठाकरे गटाला जातील. मात्र, आमचं आजही मत आहे, अमित ठाकरेंना मदत करायला हवी, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

काय आहे माहीम मतदारसंघात परिस्थिती?

माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पण चर्चा आहे ती सदा सरवणकर यांची. विद्यमान आमदार सदा सरवणकर या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारीसाठी पू्र्ण तयारीत होते. पण अमित ठाकरेंच्या उमेदवारीमुळे माहीम मतदारसंघातली गणितं बदलली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube