अजितदादांनी असं का केलं?, हे तेच…; बड्या नेत्याचं काम करण्यावर फडणवीसांचा थेट नकार

  • Written By: Published:
अजितदादांनी असं का केलं?, हे तेच…; बड्या नेत्याचं काम करण्यावर फडणवीसांचा थेट नकार

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवाराकडून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजितदादांच्या या भूमिकेनंतर भाजपच्या गोटात नाराजीचा सूर असून, मलिकांचा प्रचार न करण्याची कठोर भूमिका भाजपच्या नेत्यांसह सर्वच कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या भूमिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संताप व्यक्त करत ही 100 टक्के समस्या असल्याचे म्हटले आहे. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. (Devendra Fadnavis On Nawab Malik)

अजितदादांनी पवारांकडे तक्रार केली होती; भुजबळांच्या मोठ्या दाव्याने राजकीय खळबळ

फडणवीस म्हणाले की, भाजपच्या सर्व विरोधाला न जुमानता नवाब मलिक यांनी मुंबईतील मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आम्ही राष्ट्रवादीला सुरुवातीलाच नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले होते, तरीही त्यांनी ते दिले आहे. हे चुकीचे आहे.

नवाब मलिकांसाठी काम करणार नाही

राष्ट्रवादीकडून मलिक यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही भाजप युतीमध्ये मलिक यांचा प्रचार करणार नसल्याची जाहीर भूमिका फडणवीसांनी बोलताना मांडली आहे. मलिकांना ज्याठिकाणाहून उमेदवारी देण्यात आली आहे. तेथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही उमेदवार असून, शिवसेनेचा उमेदवाराचे काम आम्ही करू असे फडणवीसांनी स्पष्ट केले. तसेच मलिकांना विरोध असतानाही त्यांना भाजचं का नाही ऐकले यबाबत अजित पवारांना विचारावे असे फडणवीस म्हणाले.

“शरद पवार प्रगल्भ नेते पण, त्यांनी माझी नक्कल करणं..”, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?

अणुशक्ती नगरमधून मुलगी मैदानात

नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्ती नगरचे विद्यामान आमदार असून, यंदाच्या विधानसभा निवडणुकांसाठी ही जागा मलिकांनी त्यांची मुलगी सना मलिक हिच्यासाठी सोडली असून, सना मलिक यांना अजित पवाराकडून या जागेवरून अधिकृत उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांना शेवटच्या क्षणी मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

अजित पवारांकडून सिंचन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली A टू Z कहाणी

नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक

एकेकाळी शरद पवार यांच्या जवळचे नवाब मलिक महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये मंत्री होते. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद आणि छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात मलिकांना 2022 मध्ये अटक केली होती. त्यानंतर मलिक यांना या वर्षी जुलैमध्ये वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने मित्रपक्ष भाजपच्या आक्षेपानंतरही नवाब मलिक यांना आपल्या गोटात घेतले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube