Download App

आता शिंदे सरकारचाही आक्रमक पवित्रा : वाढत्या मागण्यांनी जरांगेंसोबतच्या चर्चेची दारे बंद!

  • Written By: Last Updated:

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (दि.20) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला आहे. मात्र, आरक्षणासाठी वेळीवेळी बदलणाऱ्या मागण्यांमुळे राज्य सरकारमध्ये नाराजी आहे. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढे जरांगेंशी चर्चा करू नये यावर शिंदे सरकारचं (Eknath Shinde) एकमत झाले असल्याचे सांगितले जात आहे.

जरांगे पाटील ‘अंतरवालीतून’ निघाले, पण ‘मुंबईत’ पोहचणारच नाहीत! शिंदे सरकारचा प्लॅन रेडी

एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार, प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असे असतानादेखील जरांगेंच्या बदलत्या मागण्यांमुळे सरकारमध्ये नाराजी आहे. कुणबी नोंदी सापडत आहेत. शिवाय पुढील महिन्यात विशेष अधिवेशनदेखील बोलावण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही जरांगेंनी मुंबईकडे कूच केली आहे. सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील असतानादेखील जरांगेंचा हा मोर्चा कशासाठी असा सवाल सरकारकडून उपस्थित केला जात आहे. या सर्व पार्वभूमिवर येथून पुढे मनोज जरांगेंशी चर्चा करून नये असे एकमत सरकारमधील मंत्र्याचे झाले असल्याचे सांगितले जात आहे. जरांगे पाटलांनी अशाच पद्धतीने जरांगेंची भूमिका राहणार असेल तर, येथून पुढे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास आम्ही तयार नसल्याचा सूर समोर आल्याचे सांगितले जात आहे.

Sharad Pawar : ‘ईडीचा वापर हत्यार म्हणून… ; शरद पवारांचा थेट PM मोदींवर हल्लाबोल

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठ विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतरदेखील जरांगे पाटलांकडून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहे. या वाढत्या मागण्यांमुळे सरकारमधील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असून, यापुढे जरांगेंशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचे सांगितले आहे.

डोळे पाणावले, कंठही दाटून आला.. जरांगे पाटील भावूक, म्हणाले, मराठा समाजाची..

कुणाशी वाद घालू नका ?

दुसरीकडे काल (दि.19) मुंबईकडे कूच करण्यापूर्वी जरांगे पाटलांनी मराठा समाजाला काही आवाहने केली आहे. आपल्या सगळ्यांना मुंबईकडे जावून आरक्षण मिळवायचे आहे. त्यामुळे कुणाशी वाद घ्यालायचे नाही. कुठला जातीशी वाद घालायचा नाही. कोणी काही म्हणत असेल तर तिकडे लक्ष द्यायचे नाही. कुणीच गैरसमज करू घ्यायचा नाही. मी जिवंत असेपर्यंत दगाफटका करणार नाही. आरक्षण मिळण्याशिवाय माघार नाहीच, आरक्षण मिळवायचे आहे. गैरसमज पसरवत असतात. गैरसमज करून घ्यायचे आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय माघार नाही, असे जरांगे म्हणाले. काही समाजबांधव मागे राहणार आहे. आम्ही मुंबईची खिंड लढवत आहे. मागची बाजू तुम्ही लढवा. ताकदीने शांततेत आंदोलन करायचे असून, आरक्षणासाठी जीव देण्याची गरज नाही. पण एकजूट फुटू देऊ नका, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे.

follow us