Manoj Jarange Patil Accept Government Condition : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मंगळवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवला. दरम्यान आता मनोज जरांगे पाटलांनी सरकारची एक मोठी (Mumbai Morcha) अट मान्य केल्याचं समोर आलंय. ही अट नेमकी कोणती आहे? ते आपण सविस्तर पाहू या.
… पण शांतता राखा
शिवनेरीच्या पायथ्याशी झालेल्या सभेत जरांगे यांनी स्पष्ट सूचना दिल्या की, समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सरकारने आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीचं स्वागत आहे, पण मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष करणार आणि शासनाने ठरवलेल्या नियमांचं पालन करणार. त्यांनी उपस्थितांना आवाहन करताना कायद्याचे पालन करण्याचे आवर्जून सांगितले. हातातोंडाशी आलेला घास काढून घेऊ नका, पण शांतता राखा. संघर्ष आमचा सुरूच राहील, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
KBC 17 वर राष्ट्रीय क्रीडा दिनाचा जल्लोष! महिला आइस हॉकी संघाचा अमिताभ बच्चन यांनी केला सन्मान
मागे हटणार नाही…
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी केवळ 5 हजार लोकांना परवानगी दिल्याची अट घातली आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, शासनाची अट आम्ही मान्य करतो. जर पाच हजारांची मर्यादा असेल, तर आम्ही चारच हजार कार्यकर्त्यांसह मैदानात बसू. बाकीचे आंदोलक इतर मैदानावर बसतील. पण या लढ्यातून मी मागे हटणार नाही.
“आंदोलनाला फक्त एक दिवसाची परवानगी देऊन मुख्यमंत्र्यांनी..”, जरांगेंचा फडणवीसांना रोखठोक इशारा
न्यायालयीन बंदीवरूनही परवानगी
पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करण्यास मनाई केली होती. तरीसुद्धा जरांगे यांनी बेमुदत आंदोलनाचा निर्धार केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईकडे निघालेल्या त्यांच्या प्रवासादरम्यान राज्य सरकारकडून त्यांना मोठे ‘सरप्राईज गिफ्ट’ मिळाले. मुंबई पोलिसांनी अटींसह आंदोलनाची परवानगी दिली.
परवानगी एका दिवसापुरतीच
29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आझाद मैदानात आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे केवळ कायदेशीर प्रश्न नाही, तर लाखो युवकांच्या भवितव्याशी निगडित आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटीलांचे मुंबई आंदोलन हे राजकीयदृष्ट्याही महत्वाचे ठरणार आहे. कारण सरकारवर दबाव आणून तातडीने निर्णय घ्यावा, हा मराठा समाजाचा ठाम आग्रह आहे.