Download App

फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर…; मनोज जरांगेंची सदाभाऊ खोतांवर तुफान फटकेबाजी

भुजबळांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले, फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर आहेत, अशी टीका जरांगे पाटलांनी केलाी.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभर शांतता रॅली सुरू केली. आज शांतता रॅलीची सांगलीत सभा झाली. यावेळी जरांगे पाटलांनी तुफान फटकेबाजी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी मला नोटीस पाठवली आणि समजलं की माझ्यामागे एसआयटी देखील आहे. ___

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे आणि देणारे अधिकारी आले गोत्यात ? बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी 

जातीला बाप म्हणा...
सांगलीच्या शांतता रॅलीत बोलतांना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या आमदार आणि मंत्र्याना पक्ष मोठा वाटायला लागले. आता त्यांनी जातीला बाप म्हणायला शिकलं पाहिजे. पक्षाला अन् नेत्याला बाप मानणं बंद केलं पाहिजे. तुम्हाला तुमचा पक्ष मोठा करायचा आहे. पण, मला माझ्या मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे आहेत, असं जरांगे म्हणाले.

यावेळी जरांगे म्हणाले, फडणवीसांना छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्याविरोधात उभे केले. भुरट्या चोरापासून सगळे फडणवीसकडेच आहेत, सगळे भुरटेच माझ्या मागे लावले. कारण, मी आरक्षण मागत आहेत. ना की जात मोठी करत आहे, माझ्याविरोधात फडणवीसांनी दुसरं जाळं टाकलं. ते मराठा समन्वययक फोडत आहेत,असा आरोपही जरांगेंनी केला.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे आणि देणारे अधिकारी आले गोत्यात ? बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी 

अनेक पिढ्या वाया गेल्या
जरांगे म्हणाले, महिलांना आता लक्षात आले की, माझं लेकरू शिकले आहे. पण, त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही. नोकरी मिळत नाही. त्यामुळं तुम्ही पक्षाशी नाही तर मुलांसी आणि जातीशी निष्ठावान राहा. आतापर्यंत आपण पक्षांवर निष्ठा ठेवली. कधी कोणत्या पक्षाचा रागराग केला नाही. कधी कोणत्या नेत्याला वाईट बोललो नाही. त्यांनी सांगायचे अन् आपण मतदान करायचं यामुळं अनेक पिढ्या वाया गेल्या. आज एकही आपल्या बाजूने नाही, असंही जरांगे म्हणाले.

मराठ्यांची रग आणि धग दाखवायची आता वेळ आहे. आरक्षणाशिवाय पर्याय नाही… तुम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. आरक्षण म्हणजे त्यांच्या बापाची जहागीरदारी नाही. फक्त एकदाच साथ द्या यांच्या छताड्यावर पाय ठेवू, असा इशाराही जरांगेंनी दिला.

फडणवीस ज्या मतदारसंघात भुजबळांना घेऊन फिरतील त्या मतदारसंघातील उमेदवारही पाडा, असं आवाहनही जरांगेंनी केलं.

follow us