Download App

त्यांना एकदा एकत्र येऊन पडू द्या; राज ठाकरे अन् उद्धव ठाकेरंच्या युतीवर जरांगे पाटील काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चेवर भाष्य केलं आहे.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil on Raj-Uddhav Alliance : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारलेला आहे. त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. (Patil) मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, त्यांनी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवरही भाष्य केलं.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर, आमचं पोट दुखायचं कारण नाही. जुनी म्हण आहे की ‘मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे’ कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावेत असं होतं. पण ते कशासाठी म्हणत होते? माहिती नाही.

त्यांचं राजकारण कचराकुंडीत गेलं; सोबत जाणारा समाप्त होईल, राज ठाकरेंना भाजप खासदारने डिवचलं

दोन भावांनी एकत्र यावं, वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडू द्या, पण लोकांची इच्छा आहे ना, दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं. लोकांची इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं, त्यात आमचा काही फायदा नाही, एकदा होऊन जाऊ द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत, मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा आणि धनगर वेगळा नसून एकच आहे, आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढे नसणार, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षाणाला धनगरांचा विरोध नाही, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे, यावर बोलताना पहिल्यापेक्षा पाचपट संख्येनं अधिक मराठा समाज या मोर्चात सहभागी होईल, हा मोर्चा अंतरवाली सराटी मार्गे, अहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट, कल्याण मार्गे मुंबईत धडकणार आहे.

follow us