Manoj Jarange Patil Entered In Ahilyanagar : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आज नव्या उंचीवर नेण्यात आले आहे. आंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना झालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गुरूवारी मध्यरात्री नगर जिल्ह्यात दाखल झाले. याच वेळी महावितरणच्या (Ahilyanagar) गलथान कारभाराने आंदोलकांचा संताप उफाळून आला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) नगरमध्ये दाखल होण्याआधीच नेप्ती बायपास परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांनी थेट प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
आंदोलकांचा संताप
नगर–कल्याण महामार्गावरील नेप्ती बायपास चौकात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमले होते. “एक मराठा, लाख मराठा” च्या गजराने संपूर्ण नगर दुमदुमून गेले. ज्या चौकात आंदोलन सुरू होते, तेथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने मराठा बांधव संतप्त झाले. हा प्रकार जाणूनबुजून करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी प्रशासनावर केला. जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी ठाम मागणीही या वेळी करण्यात आली.
जखमी बाईकस्वाराच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले विघ्नहर्ता
मुसळधार पावसात आंदोलन
मुसळधार पावसातही आंदोलकांनी माघार घेतली नाही. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम असतानाही बांधवांनी रस्त्यावरच ठाम उपस्थिती दर्शवली. आरक्षण द्या, नाहीतर सरकार उलथवून टाकेन, अशी ठाम भूमिका आता मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे.
मनोज जरांगे पाटलांसोबत सरकार चर्चा करणार की नाही?, मंत्री विखे पाटलांनी दिली महत्वाची माहिती
प्रमुख मागण्या
– मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे सरकारने मान्य करावे.
– सातारा, औंध आणि हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करावी.
– मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्राण गमावलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना तातडीने नोकरी द्यावी.
– आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.