Download App

गुणवर्ते सदावर्तेंचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद, उच्च न्यायालयाने केली कानउघडणी

राज्याची राजधानी मुंबईत मनोज जरांगे यांनी मोर्चा काढत मुंबईलाच वेठीला धरले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक याचिका.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे शुक्रवारपासून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आंदोलकांनी नियमांचे उल्लंघन केलेले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. (Jarange) मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही जरांगे यांना नोटीस काढू शकता असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तीवाद करताना राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे आंदोलन घडवून आणले जात असल्याचा आरोप केला आहे.

मनोज जरांगे यांना आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नाही तरी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे असा युक्तीवाद वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. या संदर्भात आपण २९ तारखेला आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे, पण पोलिसानी गुन्हा दाखल केला नाही असेही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी युक्तीवादात सांगितले. मागच्या वेळी असेच आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी आपण केलेल्या तक्रारीनुसार जरांगे यांच्या आंदोलकांना वाशीमध्ये थांबण्यात आले होते.

आंदोलक नाही, हुल्लडबाज सरकार; मीडियावरही मनोज जरांगे संतापले, थेट CM फडणवीसांचं नाव घेतलं

राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सगळं घडवून आणले जात आहे असा युक्तीवाद यावेळी सदावर्ते यांनी केला आहे. सीएसएमटी, आणि चार मोठी रुग्णालय तिथे आहेत तेथील जनजीवन आणि अत्यंत आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत असाही युक्तीवाद यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी करतानाच सीएसएमटी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे तिथे आंदोलन केले जात आहे, कोर्टाच्या आजूबाजूलही आंदोलक आहेत असेही सदावर्ते युक्तीवादाच्या वेळी सांगितले.

यावेळी न्यायाधीशांनीही सांगितलं हो, ते कोर्टाच्या आजूबाजूलाही दिसले आहेत. या आंदोलक गाड्यांचे लायसन्स आहे का ? असे वाहनधारकांकडे विचारात आहेत, रेल्वे ट्रॅकवर उतरत आहेत, सगळ्या रस्त्यांवर गाड्या अडवत आहेत असाही युक्तीवाद सदावर्ते यांनी केला आहे. सीएसटीमधल्या तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो सदावर्ते यांनी यावेळी न्यायाधीशांना दाखवले. रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी डब्यात वाट्टेल तसे आंदोलक फिरत आहेत असेही यावेळी गुणरत्ने यांनी सांगितले.

follow us