आंदोलक नाही, हुल्लडबाज सरकार; मीडियावरही मनोज जरांगे संतापले, थेट CM फडणवीसांचं नाव घेतलं…

आंदोलक नाही, हुल्लडबाज सरकार; मीडियावरही मनोज जरांगे संतापले, थेट CM फडणवीसांचं नाव घेतलं…

Manoj Jarange Patil Allegation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून काही चॅनल जाणूनबुजून चुकीच्या बातम्या दाखवत आहेत. वेळ आली तर नाव पण घेईल. चुकीचे आरोप ऐकून घेणार नाही, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलाय. आज मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) चौथा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर आणि माध्यमांवर थेट निशाणा साधला. आंदोलनकर्त्यांवर हुल्लडबाजीचे ठपके ठेवले जात असताना जरांगेंनी सरकारला जबाबदार ठरवले.

बोगस सरकार, बोगस मुख्यमंत्री…

“हुल्लडबाज आंदोलक नाहीत, हुल्लडबाज सरकार आहे. मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईत येणार हे चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. तरीसुद्धा सुविधा न पुरवता आंदोलनकर्त्यांना अडचणीत टाकलं जात आहे. बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे. आम्ही दोन वर्ष सरकारला दिली आहे. सरकारने मुंबईची शांतता बिघडवली आहे, अशी टीका जरांगेंनी केली. माध्यमांकडे बोट दाखवत ते म्हणाले, सरकारच्या सांगण्यावरून आमच्यावर वार करू नका. काही चॅनेल्स उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून आमच्यावर तुटून पडत आहेत. वेळ आली तर नाव घेण्यास मागेपुढे पाहणार नाही.

“पोलिस स्टेशन में भूत” या रोमांचक हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी राम गोपाल वर्मा – मनोज वाजपेयी एकत्र

जेवणाच्या गाड्या अडवल्या

आंदोलनकर्त्यांना मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरला. खायला नाही, प्यायला नाही, लाईट नाही. जेवणाच्या गाड्या अडवल्या जात आहेत, हे तुम्ही का दाखवत नाही? मुलं हुल्लडबाज नाहीत, सरकारनेच सुविधा रोखल्या. आमचं जेवण बंद केलं. हे पोरांचं म्हणणं आहे, पण सरकारच्या सांगण्यावरून तुम्ही वेगळ्या बातम्या दाखवता,” असा सवाल त्यांनी मांडला.

तुमचा Gmail पासवर्ड लगेच बदला! स्वत: गुगलनेच दिला वापरकर्त्यांना इशारा, धक्कादायक कारण…

संपादक अडचणीत येऊ शकतो

पत्रकारितेच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन वर्षांत मी कधीच मीडियावर टीका केली नाही. पण येथे आल्यावर काही जण चाभरे असल्याचं स्पष्ट झालं. पत्रकार हे देवासारखे असतात, पण काही जणांमुळे संपूर्ण चॅनेल आणि त्यांचा संपादक अडचणीत येऊ शकतो, असा इशाराही जरांगेंनी दिला.

मी मुंबई सोडत नाही, अजूनही तुमच्या हातातील वेळ गेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणार आहे. त्याआधी अंमलबजावणी करा, अन्यथा मुंबईत उभं राहायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मी विचित्र रसायन आहे. माझा समाज मला सोडू शकत नाही. त्यासाठी तो पक्षाला लाथ मारू शकतो. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळे बालिश बुद्धीमुळे, देशाला डाग लागू शकतो.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube