मोठी बातमी, अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली, पोलिसांचा फौजफाटा तैनात

  • Written By: Published:
मोठी बातमी, अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली, पोलिसांचा फौजफाटा तैनात

OBC Protest : राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आता ओबीसी (OBC) समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. आज जरांगे पाटील यांच्या गावात आंदोलन करणार आहे. अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) आज ओबीसी आंदोलक आंदोलन करणार आहेत मात्र आता या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

पोलिसांनी परवागी नाकारल्यानंतर देखील आंदोलनाचा अधिकार असल्याचा आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे (Babasaheb Batule) आणि बाबासाहेब दखने (Babasaheb Dakhne) हे अंतरवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

माहितीनुसार, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी आज जालन्यातील आंतरवाली सराटीमधील सोनिया नगरमध्ये ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने हे आमरण उपोषण करणार आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतर आम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे असा आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने आंतरवाली सराटीमधील सोनिया नगरमध्ये आंदोलन करण्यास ठाम असल्याने परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहे. आज त्यांच्या या आंदोलनाचा चौथा दिवस असून जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आंदोलनावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

माझी नैतिक जबाबदारी असल्याने…, आझाद मैदानावरील घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

जेव्हापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली असून आजपासून (1 सप्टेंबर) पाणी न पिण्याचा निर्णय देखील मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube