राजकारण राजकारणाच्या ठिकाणी मराठा आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी. (Jarange) तो विषय यात कशाला घुसवला? आणि धनंजय मुंडे म्हणतो माजी सीबीआय आणि नार्को टेस्ट करा पण आता उद्या मी कोर्टात टेस्टसाठी आर्ज करतो. मी त्याला भीत नाही. (Munde) मीच अर्ज करतो असं म्हणत जरांगे पाटील यांनी थेट रेकॉर्डिंगच ऐकवली. यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव घेत दोन व्यक्ती सुपारी घेतल्याचं बोलत आहेत.
मी उद्या कोर्टात माझी नार्को टेस्ट करा यासाठी अर्ज करणार आहे. जर अर्ज केला नाही तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा तुम्ही द्या असं म्हणत आता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात दंड थोपाटले आहेत. त्याचबरोबर हा विषय आरक्षणाचा नसून जीनव मरणाचा आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Video : कर्मा रिपीट्स, जरांगे फार महागात पडणार धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
लोकांना पळून लावणं, लोकांना मारणं, लोकांना मारायला लावलं ही असली धनंजय मुंडे यांची कामच आहेत. हा कुणाचाच नाही. नासक्या मानसिकतेचा हा माणूस आहे. त्याच्यामुळे समाजाने याच्या नादी लागू नये. आणि तु नासका आहेस, उगाच ओबीसी समाजाच्या आडून स्वत:ची पाप झाकू नको असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
हा कोणत्याच नेत्याचा नाही, हा कुठल्या पक्षाचा नाही. याने अजित पवारांच्या पक्षाचं वाटूळ केलं आहे. त्यामुळे माझी आता अजित पवार आणि मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावं असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
