Download App

मोठी बातमी! 23 तारखेला मनोज जरांगे मुंबईत, CM फडणवीसांची भेट घेणार; मराठा आरक्षण…

Manoj Jarange Patil Will Meet CM Devendra Fadnavis On 23 April : येत्या 23 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी (CM Devendra Fadnavis) चर्चा करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतली. पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे जरांगे (Maratha Reservation Issue) यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केली आहे. मागच्या दोन वर्षांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत.

मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगे यांना आश्वासन दिलं होतं. आता आश्वासनाची मुदत संपत आहे. त्याआधी सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. येत्या 23 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्यासंर्दभात चर्चा करणार (Maharashtra Politics) असल्याचं सामंत यांनी म्हंटलंय.

शेतकऱ्यांचे 20 कोटी खाल्ले… जालन्यात अतिवृष्टी अनुदानात घोटाळा; ग्रामसेवक, तलाठी, कृषी साहाय्यकांनी डल्ला मारला

दरम्यान कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करावे, असं जरांगे यांनी म्हटलंय. सरकारला दिलेली मुदत 30 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळं सरकारनं मागण्या मंजूर केल्या. राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही जाहीरपणे भेटलो आहे. संजय राऊतांनी शिंदेंच्या कामाचं प्रमाणपत्र देण्याची गरज (Maratha Reservation) नाही. त्यांच्याकडे असलेले दहा-पंधरा आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळावे. त्यांच्यावर टीका करून आम्हाला संजय राऊत यांना मोठं करायचं नाही, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

काय सांगता? इंस्टाग्राम-व्हॉट्सअप विकले जाणार…फसवणुकीच्या प्रकरणात मार्क झुकेरबर्ग अडकले?

मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. कुणीही माझ्या भेटीसाठी आलं, तरी समाजाच्या प्रश्नावरच चर्चा करणार असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मराठा समाजाचे तिन्ही गॅजेटियर लागू करा, कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या, कुणबी प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करा, अशा मनोज जरांगे यांच्या मागण्या आहेत.

 

follow us