Manoj Jarange Slam Chhagan Bhujbal: गेल्या 2 दिवसांपासून दौरा सुरू आहे. आज नाशिक जिल्ह्यात आहे,देवीचे देखील दर्शन घेणार आहे.बालेकिल्ला कुणाचा नसतो, (Nashik News) नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला आहे. 10 तारखेला उपोषण करणार आहे.2001च्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली.येत्या 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी 10 तारखेपासून उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.
सगेसोयरेंच्याबाबत जो कायदा आहे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या बाबत अंमलबजावणी सुरू करण्यासाठी 10 तारखेपासून आंदोलन करणार आहे.सगेसोयरे यांच्या बद्दल जे अध्यादेश काढले आहे, त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी यासाठी पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. तो कधीच बोलत नाहीत,नाशिकला आल्यावर ते बोलले कारण नाशिकचे पाणीच तस आहे,ते तेवढ्या पुरते होते.असे यावेळी मनोज जरांगे म्हणाले.
हजूर साहिब गुरुद्वाराचा निर्णय अन् रडारवर आले CM शिंदे; नेमकं काय घडलं?
दुसऱ्याच्या अन्नात माती कालवाणे हाच त्यांचा उद्देश आहे.ज्या पक्षात जाईल तो पक्ष त्यांनी मोडला आहे. स्वतःचे कुटुंब देखील त्यांनी फोडले आहे. त्यांनी असे काम करू नये नाहीतर आम्हाला मंडळ आयोगाला देखील चॅलेंज करावे लागणार आहे. ओबीसी नेत्यांनी आमच्या अध्यादेशाला चॅलेंज केले तर आम्ही देखील करू कारण याआधी देखील 3 वेळा असे झाले आहे. तुमच्या इतक्या खालची नियत आमची नाही. आता आमचा नाईलाज आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) गप्प बसले नाही तर देशातील 27 टक्के ओबीसी आरक्षण घालवू. विनंती केली,मध्यस्थी केली,पाया पडलो तरी ते ऐकत नाहीत. असे यावेळी मनोज जरांगे म्हणाले.
राजकारणातील मला काही कळत नाही फक्त आरक्षण बद्दल बोलतो. ओबीसी आरक्षण हक्काचे आहे,दोन्हीकडे प्रयत्न सुरू आहेत, मराठा समजाचा चांगले होईल. ओबीसीमधून आरक्षण सुरू केली,जबरदस्ती नाही ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे. माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी मरण हातात घेऊन आंदोलन करणार आहे. मुंबईत गेल्यावर कसे पळत होते सगळे त्यामुळे आता घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. दे म्हणून तो राजीनामा देत नसतो. मी त्याच्या इतक्या खलाच्या पातळीला जाणार नाही. त्याने फक्त गरीब नाभिक समाजाची माफी मागावी.नाही मागितले तर, तो मग्रूर आहे असा त्याचा अर्थ होतो. असे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना खडेबोल सुनावले आहे.