Manoj Jarange Warn to government for Maratha Reservation Strike : गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केला पण आता ती चूक करू नका असा इशारा यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर! पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
काय म्हणाले मनोज जरांगे?
मराठा आंदोलकांनी कुणी कुणाची वाट पाहू नका. आता कोणतीही बैठक होणार नाही. तालुक्यात आणि जिल्ह्यात कोणीही वाट बघायची नाही. आता सगळ्यांनी सरळ मुंबईला निघायचं आहे. माझं शरीरही साथ देत नाही आहे. आरक्षणासाठी 2 वर्ष संधी दिली. त्यामुळे सरकारला आता संधी देणार नाही. ते कितीही वेळ अभ्यास करतील. त्यांनाच अभ्यास करायचा होता तर समिती कशाला नेमली? आम्हाला, समितीला, आयोगाला, घटनातज्ज्ञांना अभ्यास करायचा आहे. असं म्हणत सरकार नाटकं करत आहे.
तिसरी ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातून तिसरी भाषा हद्दपार! एससीईआरटीकडून सुधारीत अभ्यासक्रम जाहीर
तुम्ही अला 15 वर्ष अभ्यास करत बसाल अन् आम्ही उस तोडत बसतो. आम्हाला शेती विकायची वेळ आली आहे. आमच्या मागणीवर अंमलबाजवणी करा. अन्यथा आम्ही वेगळा मार्ग अवलंबू. मराठ्यांच्या नादाला लागू नका. पांदन रस्ताही शिल्लक ठेवणार नाही. फडणवीस आणि सरकारला सांगतो. आमच्या मुंबईत येणाऱ्या एकाही मराठा आंदोलकांना काठीही लागला कामा नये. आम्ही शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. मी माझ्या समाजाला वाईट मार्गाला लागू देत नाही. तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केला पण आता ती चूक करू नका असा इशारा यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला आहे.