Manoj Jarange : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) अनेक मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा आक्रमक झाले आहेत. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीमध्ये ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. या उपोषणानिमित्त जरांगे यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. ओबीसी, मराठा समाज वाद, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
25 ते 26 एकर जमीन घेतली. टेंडर मिळाले आहे का ? यावर जरांगे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. तो म्हणतोय ना 25 ते 26 एकर जमीन घेतली. घेतलीय, त्यात आडव्या, उभ्या फुल्ला पडायचे काम सुरू आहेत. त्यात केळं लावायची आहेत. त्यांना खायला लागतील ना ? काय औलादी आहोत, असे जरांगे म्हणाले. आम्ही मराठ्यांचे लोक विचित्र आहोत. आमच्याकडे पैसे आल्यानंतर आम्ही ते खाली नाहीत ठेवत. वरच्या खिशात ठेवतो. लोकांना पाचशे दिसावेत, इतके फुगीर आहोत आम्ही आहे. आमच्या लोकांना पैसे पचत नाहीत. गरिब मराठ्यांवर श्रीमंत मराठा प्रेम करणारे आहेत. उद्योगपती, व्यवसाय, राजकारणी, शिक्षणसम्राट, यांना वाटतं आपल्या समाजातील मुलांसाठी काम करतो. त्यामुळे ते मला मदत करतात, गाड्या देतात, असे जरांगे म्हणाले.
मृत्युआधी संगीता चांदगुडे यांचे हादरवणारे आरोप; जुन्या कौटुंबिक वादाच्या चर्चेला उधाण
तुम्हाला मोटारसायकल, टमटम कुणी दिली का ?
महागडा गाडीवरून जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर जोरदार टीका केली. तुम्हाला मोटारसायकल, टमटम कुणी दिली का ? भिकारांनो, तुम्हाला नेतेगिरी करायची आहे. मंत्री, आमदार व्हायचे तुम्हाला, पैसे कमवायचे आहे. तुम्हाला कोण विचारणार आहे. माझा समाज मला जीव लावतो. त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकला आहे मी, कधीही मरायला तयार आहे. त्यांच्यापुढे गाडीला काय किंमत आहे. दिले दोन दिवस फिरायला आहे. तुझे काय जाते. रिक्षा, इंडिकामध्ये बसतो मी. मरताना मला सगळ्या गाड्यांचे सुख घेऊ द्या. तुमची गांXXXदुखती का ? आता एकजण 28 कोटींची गाडी देणार आहेत. त्यात हिंडलो तर तो फाशीच घेईल, असे जरांगे म्हणाले.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईविरोधात तेल व्यापारी एकवटले; नाशिक बैठकीकडे राज्याचे लक्ष
टेंडर दाखवा एखादे ?
टेंडर दाखवा एखादे ? मी त्यात पार्टनर होतो, एक जण म्हणतो मला हाणले तर मी सांगतो मनोज जरांगेंच्या अंगावर बोट लावणारा सुध्दा माई का लाल पैदा झालेला नाही. इथून पुढे तयार होणार नाही. नाहीतर खानदानाला कुंकू लावायला ठेवणार नाही. मी अस्सल जात वाण पिल्लू आहे. टप्पर नाही, पंधरा-सोळा गावे अंगावर यायचे टप्पर नाही. यांना मोजत नाही. पाच बोटं लावायची टप्पर नाही. मी सरकार आणि राज्याला खेटतोय. काही तरी असल्याशिवाय. देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे मी काही तरी रसायन आहे. पोहोचलेली हस्ती आहे, सोपी नाही. भाषणात कशासाठी बोलायचे आहे. पाच बोट लावू शकत नाही, त्या दिवशी त्याच्या घरात माणूस कुंकू लावायला ठेवणार नाही. जातवाण औलाद जात आहे क्षेत्रीयांची. कुणाला पाय आणि बोट लावात नाही. चुक करत नाही, असे प्रत्युत्तर जरांगे यांनी दिले आहे. अंतरवाली गावच्या शेजारी असलेले बुटुळे बाबा हे जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतात. त्यालाच जरांगे यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
