Download App

‘…ती वेळ येऊ देऊ नका, अन्यथा जनता तपास करणार’, देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंचा इशारा

तपास जर जनतेने हातात घेतला ना, तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कळेल काय वचका असतो ते... ती वेळ येऊ देऊ नका.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मंत्री धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) हे या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. मात्र, अद्याप त्यांची चौकशीही झाली नाही. आरोपींना पकडले जात नसल्याबद्दल आता मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे.

Satish Wagh Murder Case : पत्नीचं निघाली मास्टरमाईंड, प्रेमप्रकरणातून सुपारी देऊन पतीला संपवलं… 

मनोज जरांगेंनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केलं. जरांगे म्हणाले, तपास जर जनतेने हातात घेतला ना, तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कळेल काय वचका असतो ते… ती वेळ येऊ देऊ नका. मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या कॉल्सची माहिती काढायला तुम्हाला 20 दिवसांचा अवधी लागतो का?, असा सवाल जरांगे यांनी सरकारला केला.

पुढं ते म्हणाले, देशमुख कुटुंबियांचीमागणी आहे ना चौकशीची तर सखोल चौकशी करायची. तुम्ही चौकशी का नाही करत? जीव गेला, आम्हाला न्याय मिळणार नाही का? त्या आरोपींला अटक होणार नाही का? कुटुंबाने ज्यांची नावे घेतली ते तुरुंगातच गेले पाहिजे, कोणाचाही बाप येऊ द्या, मी ते प्रकऱण दबू देणार नाही. पूर्णपणे बाहेर काढणार आहे. तुमच्या चौकशीत जर आरोपी सापडले नाही किंवा सापडले असतील आणि तुम्ही सोडले असे तर मराठे तुमचा बंदोबस्त करणार, सुट्टी नाहीच, असा इशारा जरांगेंनी दिला.

बीड ‘बिहार’ झालाय! 10 महिन्यात 36 जणांना संपवलं, महिला अत्याचाराच्या घटनांतही वाढ… 

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की. मात्र, सरकार शांत झोपलेय, अशी टीका आव्हाड यांनी केली.

28 तारखेला भव्य मोर्चा…
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. हे हत्या प्रकरण राज्यात चर्चेचा विषय बनलं. या प्रकरणाची योग्य चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी विरोधक करत आहे. हे हत्या प्रकरण चांगलेच तापलं. आता सरकारच्या कारभाराच्या विरोधात २८ डिसेंबरला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

देशमुखांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?
एकूण 8 पानाचा हा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे. रिपोर्टमध्ये संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. गंभीर मारहाणीमुळे देशमुख यांच्या शरीरातून रक्तस्त्राव झाला. त्यामुळं देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झालं. देशमुख यांच्या छातीवर, डोक्यावर, हाता- पायावर आणि चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे त्याचा चेहरा आणि डोळे काळे-निळे झाले होते.

follow us