संतोष देशमुखची हत्या कोणी केली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती, पण सरकार शांत झोपलं…; आमदार आव्हाड
Jitendra Awhad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मंत्री धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) हे सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. मात्र, अद्याप वाल्मिक कराड यांची चौकशी झाली नाही. यावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच संतप्त झाले.
शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा करणार ; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की. मात्र, सरकार शांत झोपलेय, अशी टीका आव्हाड यांनी केली.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. हे हत्या प्रकरण राज्यात चर्चेचा विषय बनलं. या प्रकरणाची योग्य चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी विरोधक करत आहे. हे हत्या प्रकरण चांगलेच तापलं. आता सरकारच्या कारभाराच्या विरोधात २८ डिसेंबरला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
चलो बीड ! दिनांक २८ डिसेंबर!! सकाळी ११.०० वाजता
संतोष देशमुख याची निर्घृण हत्या, बीडमध्ये वाढत चाललेली खुनांची मालिका आणि त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले सरकार या निषेधार्थ भव्य मोर्चा ! महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सहभागी व्हावे !! मी जाणार आहे,…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 25, 2024
आव्हाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. आव्हाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिलं की, चलो बीड ! संतोष देशमुख याची निर्घृण हत्या, बीडमध्ये वाढत चाललेली खुनांची मालिका आणि त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले सरकार या निषेधार्थ दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सहभागी व्हावे !! मी जाणार आहे, तुम्ही पण या, असं आवाहन आव्हाड यांनी केलं.
आव्हाड यांनी पुढं लिहिलं की, कदाचित, मोर्चाला घाबरून सरकार वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करेल. पण, अजूनही वाल्मिक कराडला खुनाचा आरोपी केलेला नाही. हे सरकार किती निर्ढावलेले आहे ते बघा. उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की, संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे. मागील दोन वर्षात झालेल्या हत्यांच्या मागे कोण आहे? असे असूनही सरकार शांत झोपलेय. सरकारला खडबडून जाग आणण्यासाठी चलो बीड!, असं आव्हाड म्हणाले.
देशमुखांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?
संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आला. एकूण 8 पाणाचा हा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे. रिपोर्टमध्ये संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. गंभीर मारहाणीमुळे देशमुख यांच्या शरीरातून रक्तस्त्राव झाला. त्यामुळं देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झालं. देशमुख यांच्या छातीवर, डोक्यावर, हाता- पायावर आणि चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे त्याचा चेहरा आणि डोळे काळे-निळे झाले होते. त्यांचा मृत्यू ‘हॅमरे टू मल्टिपल इन्जुरिजमुळे’ झाल्याचं या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलं.