बीड ‘बिहार’ झालाय! 10 महिन्यात 36 जणांना संपवलं, महिला अत्याचाराच्या घटनांतही वाढ…

  • Written By: Published:
बीड ‘बिहार’ झालाय! 10 महिन्यात 36 जणांना संपवलं, महिला अत्याचाराच्या घटनांतही वाढ…

Beed Crime : ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये दाखविलेली हिंसा, गुंडगिरी, स्थानिक माफियांची दहशत, रक्तपात आणि खंडणी बहाद्दर… अन् याचं गुंडांच्या टोळ्यांवर गब्बर झालेले बाहुबली पाहिल्यावर आपला थरकाप उडतो. मात्र, या चित्रपटाचं कथानकही फिकं वाटवं, अशा गुन्हेगारीच्य घटना सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांत बीड जिल्ह्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल 36 खुनांच्या घटना घडल्याची नोंद झालीये.

एक चूक अन् गुन्हेगार पोलिसांच्या गळाला, कल्याणला हादरवणारं हत्याकांड कसं घडलं? आरोपीच्या बायकोने दिली कबुली 

बीडमध्ये गेल्या काही वर्षात सामाजिक आणि आर्थिक गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलंय… शहराची शांतता वाढत्या गुन्हेगारीमुळं धोक्यात आलीये. या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस खातंही कमी पडतंय. अलीकडेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. देशमुख यांच्या हत्येमुळं बीड जिल्हा चांगलाच हादरला. देशमुख यांच्या हत्येला 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळं पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

संतोष देशमुखची हत्या कोणी केली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती, पण सरकार शांत झोपलं…; आमदार आव्हाड 

10 महिन्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना
बीड जिल्ह्यात जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत जिल्ह्यात 36 खुन झालेत. म्हणजे, दरमहा दोन हत्या झाल्यात. खुनाच्या घटनांशिवाय खुनाच्या प्रयत्न केल्याच्याही तब्बल 168 घटना घडलेल्या आहे. यावरून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक राहिली नसल्यचं दिसयं.

गर्दी करून मारामारी करणं, दंगल घडवणं यासारखे 498 गुन्हे 10 महिन्यात दाखल झालेत. यातील 7 गुन्ह्यांची उकल अद्यापही झालेली नाही… खुना, हत्या, खंडनी हे तर सर्रास सुरू आहेत… याशिवाय, महिलांवरील गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ झालीये. यावरून बीड जिल्ह्यात महिला अन् मुलीही सुरक्षित नसल्याचं दिसंतय.. मागील 10 महिन्यांत महिला अत्याचाराच्या 156 तर विनयभंगाच्या 386 घटना घडल्या आहेत.

दोन सरपंचांच्या हत्येने बीडमध्ये खळबळ
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत दोन सरपंचांच्या हत्या झाल्यात. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आंधळे यांच्या हत्येनंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा हादरला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत विरोधी पक्षाने संसद आणि विधानसभेत आवाज उठवला आहे. देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होतेय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाही आरोपीला सोडणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, या प्रकरणातील बरेच आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यामुळं गृहखातं बीडमधील गुन्हेगारीच बिमोड कसं करतंय, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube