एक चूक अन् गुन्हेगार पोलिसांच्या गळाला, कल्याणला हादरवणारं हत्याकांड कसं घडलं? आरोपीच्या बायकोने दिली कबुली
Kalyan Couples Crime Shocking Confession : कल्याणमधील चक्कीनाका भागात एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची अपहरण करून हत्या (Kalyan East Minor Girl Rape Case) करण्यात आली. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील बापगावमध्ये घडली. याप्रकरणात पोलिसांनी एका पती-पत्नीला अटक केलीय. याप्रकरणात कोळसेवाडी भागातील विशाल गवळी, हाच प्रमुख सूत्रधार असल्याचं समोर आलंय. त्याला शेगाव येथून तर त्याची पत्नी साक्षी गवळीला कल्याण शहरातून अटक केल्याचं समोर आलंय. अटकेनंतर या पती-पत्नीने गुन्ह्याची कबुली दिलीय. त्यांनी या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून दिल्याचा धक्कादायक (Kalyan Crime News) खुलासा झालाय.
याप्रकरणी कोर्टाने आरोपी महिलेला दोन दिवसांची कोठडी (Crime News) सुनावली. रक्ताचे डाग सापडल्यामुळे पोलिसांना संशय बळावला. त्यानंतर तपासामध्ये हे सत्य उघड झालंय. विशाल गवळी नावाच्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape Case) केला. त्यानंतर त्याने त्या मुलीची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशालच्या पत्नी अन् मित्राने देखील मदत केली. दरम्यान आता पोलिसांसमोर विशालची पत्नी साक्षी हिने कबुली दिलीय.
संतोष देशमुखची हत्या कोणी केली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती, पण सरकार शांत झोपलं…; आमदार आव्हाड
विशालची पत्नी साक्षी हिने या घडलेल्या कृत्याचा संपूर्ण घटनाक्रमच पोलिसांसमोर सांगितला आहे. साक्षी ही एका खासगी बॅंकेत काम करते. विशाल गवळी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीला घेवून घरी आला होता. त्यानंतर त्याने या मुलीसोबत गैरकृत्य करून त्यानंतर तिला संपवलं. हत्या केल्यानंतर एका मोठ्या बॅगेत या मुलीचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह ठेवला. त्यानंतर साक्षी सात वाजेच्या सुमारास घरी आली. तिला विशालने घडलेला सगळा प्रकार सांगितला. घटना ऐकून साक्षी हैराण झाली होती, असं तिनं पोलिसांना सांगितलं.
राज्यात दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; ‘या’ भागात कोसळणार पाऊस
या नवरा बायकोने त्यानंतर मृतदेहाचं काय करायचं, यावर विचार केला. त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची? यासाठी एक योजना आखली. त्याअगोदर दोघांनी घरातील सगळं रक्त पुसून काढलं होतं. रात्री साडेआठच्या सुमारास विशालने मित्राची रिक्षा बोलावली. ते दोघे मृतदेह रिक्षात टाकून नऊ वाजेच्या सुमारास बापगावच्या दिशेने रवाना झाले. बापगावमध्ये अज्ञातस्थळी या अल्पवयीन मुलीचा मृतदेह टाकून तेथून पळ काढला.
बापगाववरून परतताना विशालने आधारवाडी चौकात दारू विकत घेतली. त्यानंतर तिथून विशाल बुलढाण्याला गेला, तर साक्षी कल्याणमध्येच होती. घटनेचा तपास करत असताना पोलिसांचा संशय विशालवर गेला अन् मग तपासात हा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांना विशालच्या घराजवळ रक्ताचे डाग सापडले. त्यामुळे हा खून विशालनेच केल्याचं दिसलं. त्यानंतर साक्षीला ताब्यात घेताच तिने घटनेची कबुली दिली.