Manoj Jarange : सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) आपले उपोषण स्थगित केलं. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारविरोधात एल्गार पुकारला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर थेट मंडल कमिशनविरोधात (Mandal Commission) आंदोलन छेडणार असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसी आंदोलन स्थगित, पंकजा मुंडे म्हणाल्या, माघार घेण्याचा प्रश्नच नाही!
मनोज जरागेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मराठ्यांनीही मतं दिली आहेत तुम्हाला, फडणवीस साहेब षडयंत्र हाणून पाडा. नाहीतर माझा नाईलाज आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. एकही नोंद रद्द केली तर मराठ्यांचा पुढचा लढा मंडल कमिशन रद्द करण्यासाठी असेल. आमच्या डोक्यावर पाय देऊन आमच्या हक्काचं असून आम्हाला खायला देणार नसतील तर इथून पुढंचं आंदोलन मंडल कमिशनविरोधात असले, असा इशारा जरांगेंनी दिला.
Maratha Vs OBC : आता थेट मंडळ आयोग रद्द करण्यासाठी मैदानात उतरणार; जरांगेही भडकले
पुढं बोलतांना जरांगे म्हणाले, छगन भुजबळांना स्वत:ची लेकरं कळतात, तशी मग दुसऱ्यांची लेकरं कळायला पाहिजेत. धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं भुजबळांनी कमी केलं पाहिजे. भुजबळ रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. मराठा-धनगर समाजात जातीय दंगली घडवण्याचा त्यांचा डाव आहे. भुजबळ 100 टक्के दंगल घडवणार. धनगरांनी वाद निर्माण होऊ देऊ नये. भुजबळांच ऐकून वाटोळ करुन घेऊ नका. शेवटी निर्णय तुमचा आहे. त्यांचे वाघ आहेत, आमचे पण कुणीतरी असतीलच ना. आरक्षणाशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मराठ्यांची वाटच लावायची ठरवी असेल तर आमचा नाईलाज आहे. होणारे परिणाम भोगायला तयार राहा, मराठा घरात बसणार नाही, असं जरांगे म्हणाले.
राज्य सरकारमध्ये ओबीसी नेत्यांवर दबाव आहे. तेच आंदोलन करायला लावतात, सत्ताधारी म्हमून आम्ही येणार हे सर्व मॅनेज आहे. आमच्या आरक्षणात ते आहेत. त्यांना धक्का लागतोय की नाही हे आम्हाला माहिती नाही. पण, आमच्याकडे ओबीसींच्या नोंदी आहेत. सरकारने लाखो नोंदी दाबून ठेवल्यात. ब्रिटिश कालीन जनगणनेत मराठा कुणबी दाखवलाय. 1871 मधले पुरावे आहेत. तेही घेत नाहीत, असं जरांगे म्हणाले.