Manoj Jarange : धनगर (Dhangar reservation) समाजाला एसटी आरक्षण (ST reservation) द्यावं, यासाठी धनगर समाज बांधवांकडून पंढरपूमध्ये उपोषण सुरू आहे. मात्र, राज्य सरकारकडून धनगर समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशातच आज एका सरपंचाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला. यावर आता मनोज जरागेंनी (Manoj Jarange) भाष्य करत आरक्षणासाठी जीव देणाऱ्या धनगर बांधवांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय.
भुजबळ म्हणजे लिंबू कापणारा, अंगारा फुंकणारा एक चमत्कारी बाबा; जरांगेंची नव्या वादाला फुंकर
मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, मी सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की, यांच्या बापाला एसटीतून आरक्षण द्यावं लागणार आहे. आत्महत्या करू नका. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपण त्यांच्या पाठीशी आहोत. मी तोंडापुरतं बोलत नाही. मी राजकारणी नाही. सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेऊ, असा इशारा जरागेंनी दिला.
योगेश केदारांच्या मध्यस्थिला यश; जरांगे अन् राऊतांमधील वाद मिटला
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास धनगर आरक्षणाला धक्का लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा जरी ओबीसीमध्ये आला तरी आमच्या आरक्षणामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहनही जरांगे यांनी केले आहे.
भुजबळांवर टीका
यावेळी जरांगेंनी बोलतांना मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, आलाच का तो कुठं गेलता काय माहित, तो महात्मा पाहिजे होता एखादा, लिंबू कापणारा, अंगारा फुंकणारा…. चमत्कारी बाबा आहे तो. दाढी पण आहे, कपाळाला टिका लाव. त्याला आरोप करण्यापलिकेड काय करता येत नाही. आरोप करतोय तर सिद्ध करा. तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची ताकद आहे, असं म्हणत त्याला फक्त दंगली घडवायच्यात, असा आरोप जरागेंनी केला.