भुजबळ म्हणजे लिंबू कापणारा, अंगारा फुंकणारा एक चमत्कारी बाबा; जरांगेंची नव्या वादाला फुंकर
Manoj Jarange On Chhagan Bhujbal : अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनादरम्यान मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खळबळजनक दावा केला. अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) प्रत्युत्तर दिलं.
योगेश केदारांच्या मध्यस्थिला यश; जरांगे अन् राऊतांमधील वाद मिटला
मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आलाच का तो कुठं गेलता काय माहित, तो महात्मा पाहिजे होता एखादा, लिंबू कापणारा, अंगारा फुंकणारा…. चमत्कारी बाबा आहे तो. दाढी पण आहे, कपाळाला टिका लाव. त्याला आरोप करण्यापलिकेड काय करता येत नाही. आरोप करतोय तर सिद्ध करा. तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस यांची ताकद आहे, असं जरांगे म्हणाले.
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचेच सरकार येणार, मंत्री भुजबळांचा दावा
ते म्हणाले, भुजबळांचं आता आम्ही मनावर घेत नाही. छगन भुजबळ यांना गरीब मराठा आणि ओबीसींमध्ये दंगल घडवायच्या आहेत. म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेवू नकोस. आमचं आणि गोरगरीब ओबीसींचं काही वैर नाही. उपोषणाच्या पुढे उपोषण करायचं पाप करू नको. आपण किती ज्येष्ठ आहोत, पक्षात किती मोठे आहोत. आपण विचारांची मांडणी किती पुरोगामीपणे केली पाहिजे. हे त्याच्या लक्षात नाही, त्याला फक्त दंगली घडवायच्यात, असं जरांगे म्हणाले.
पुढं ते म्हणाले की, सध्या देवेंद्र फडणवीसचे आमदार म्हणत आहेत सध्या मणिपूरसारखी परिस्थिती आहे होणार. दंगली घडवण्यावर यांनी शिक्कामोर्तब केलाय, असं जरांगे म्हणाले.
छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या माहितीनुसार अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता. मात्र, रात्री 2 वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना तिथे परत आणून बसवलं, असं भुजबळ म्हणाले होते.