योगेश केदारांच्या मध्यस्थिला यश; जरांगे अन् राऊतांमधील वाद मिटला

  • Written By: Published:
योगेश केदारांच्या मध्यस्थिला यश; जरांगे अन् राऊतांमधील वाद मिटला

Yogesh Kedar : बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) सातत्याने टीका करत आहे. जरांगे हे आंदोलन आरक्षणासाठी करत नसून मविआला सत्तेत आणण्यासाठी करत आहे, असे आरोप राऊतांनी केले. तर राऊतांच्या आरोपांना जरागेंनीही जशास तसं उत्तर दिलं. या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार (Yogesh Kedar) यांना या दोन्ही नेत्यामधील वाद मिटवण्यात यशं आलं.

Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचेच सरकार येणार, मंत्री भुजबळांचा दावा 

योगेश केदार यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरागेंमध्ये विवाद सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या, त्याचा थोडाबहुत का असेना परिणाम मराठा समाजात होत होता. त्यामुळं मी आधी राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विरोधाला विरोध करणं योग्य नाही, जरांगेच्या विरोधात बोलू नये, अशी विनंती त्यांना केली. त्यानंतर मनोज जरांगेंचीही अंतरवलीत जाऊन भेट घेतली. त्यांनाही सांगितलं की, राजेंद्र राऊतांनी मराठा समाजासाठी चांगलं काम केलं. मागच्या हाताने त्यांनी आंदोलनाला मदत केली. काहींनी गैरसमज निर्माण केले असतील तर ते डोक्यात ठेऊ नये, अशी विनंती करत या पुढे राऊत साहेब विरोध करणार नाहीत, असं सांगितलं.

20 दिवस मंत्र्याची मुलगी मोलकरणी बनून राहत होती गोविंदाच्या घरात, भांडं फुटलं अन् घडलं असं काही …  

तर आपला काही बांधाला बांध नाही, आपण समाजासाठी काम करतो, असं म्हणत जरागे म्हणाले.

विरोधाला विरोध आता बंद झाला
केदार म्हणाले, मनोज जरांगे हे आपल्या समाजाला लाभलेलं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाला सांभाळावं लागेल. त्याशिवाय विस्थापित मराठ्यांचा आवाज बुलंद होणार नाही, असं राऊतांनीही सांगितलं. मनोज जरांगे आपल्या विरोधात काही बोलले नाही, काही गैरसमज असतील तर ते मिटवले पाहिजे, असंही सांगितलं. आता दोघेही समाज हितासाठी दोन पाऊल मागे आले. विरोधाला विरोध जो सुरू होता, तो आता बंद झाला, असं केदार म्हणाले.

ठिय्या आंदोलन मनोज जरांगेंच्या विरोधात नाही. ते विशेष अधिवेशन बोलावण्यासंदर्भात आहे, असंही केदार म्हणाले.

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube