Download App

..तर ओबीसी नेत्यांच्या गाड्यांच्या काचा शिल्लक राहणार नाहीत; मराठा महासंघाचा कडक इशारा

Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेने मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मु्द्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचीही मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणात वाटेकरी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच मराठा आंदोलनादरम्यान ओबीसी कुणबी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर अशा नेत्यांच्या गाड्यांचा काचा शिल्लक राहणार नाहीत असा खणखणीत इशारा मराठा महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे.

Jalna Maratha Protest : हा लेकराबाळांचा प्रश्न, आमची फसवणूक करु नका; मनोज जरांगेंचा इशारा

जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचे उपोषण अजूनही सुरुच आहे. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) जीआर घेऊन शिष्टमंडळाने यावं असे स्पष्ट करत यासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याचीही मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणात वाटेकरी वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. या विरोधात मागील काही दिवसांपासून ओबीसी नेत्यांची नाराजी व्यक्त करणारी विधाने येत आहेत. ओबीसी नेत्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. त्यामुळे या ओबीसी नेत्यांविरोधात मराठा महासंघ मैदानात उतरला आहे.

मराठा समाजातील अनेक कुटुंबे आजही भूमिहीन आहेत. एकरावर शेती कुणाकडेही राहिलेली नाही. याउलट राजकारण करणारे ओबीसी नेते आलिशान गाड्यांतून फिरत आहेत. त्यांच्या करोडो रुपयांच्या प्रॉपर्टी आहेत. तरी देखील ते आरक्षणाचा फायदा घेत आहेत, असा आरोप मराठा महासंघाने केला. कुणाचेही नुकसान न होता आरक्षण (Maratha Reservation) मिळणार असेल तर त्यालाही विरोध करणे चुकीचे आहे असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे दिलीप जगताप यांनी सांगितले.

Maratha Reservation : मोठी बातमी ! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांचे पथक दाखल

.. तर मराठा समाज सरकारला उलथून टाकील

तामिळनाडू सरकारन ज्या पद्धतीने कार्यवाही केली. त्या धर्तीवर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा पार करता येते. तसेच आणखीही काही मार्ग उपलब्ध आहेत. आता सरकारने आडमुठी भूमिका सोडावी. जास्त वेळ वाया न घालवता तत्काळ आरक्षण (Maratha Reservation) द्यावे अन्यथा सरकाला समाज उलथून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा महासंघाने सरकारला दिला.

Tags

follow us