Download App

Maratha Reservation : मराठा बांधवांनो मी येतोयं…; मनोज जरांगेंची पुढची रणनीती ठरली!

मराठा बांधवांनो तुम्ही अंतरवली सराटीत येऊ नका, मीच तुमच्या जिल्ह्यात असल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आवाहन केलंय. येत्या 6 जुलैपासून जरांगे राज्यभर दौऱ्यावर असणार आहेत.

Image Credit: Letsupp

Maratha Reservation : मराठा बांधवांनो तुम्ही अंतरवली सराटीत येऊ नका, मीच तुमच्या जिल्ह्यात असल्याचं सांगत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यातील मराठा बांधवांना आवाहन केलंय. येत्या 6 जुलैपासून मनोज जरांगे राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याची माहिती मनोज जरांगे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन दिलीयं. दरम्यान, सगेसोयरेची मागणी करीत मनोज जरांगे यांनी लावूनच धरलीयं. आमरण उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलायं. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राज्यभर दौरा करुन पुढील रणनीती ठरवणार असल्याचं बोललं जात आहे.

Paris 2024 Olympics : भारतीय हॉकी संघ जाहीर, हरमनप्रीत सिंग कर्णधार; 5 नवे खेळाडू करणार पदार्पण

येत्या 6 जुलैला मनोज जरांगे पाटील हिंगोली जिल्ह्यात असणार आहेत तर 7 जुलैला परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड, 12 जुलै जालना, आणि 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटील मराठा बांधवांशी संवाद साधणार आहे. यावेळी मनोज जरांगे कोणती रणनीती आखून राज्य सरकारला कोंडीत पकडणार आहेत? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंयं.

जनतेने नतद्रष्ट सरकारच्या छातीतली हवा काढली; वडेट्टीवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर घणाघात

जरांगे म्हणाले, सर्वांना विनंती आहे की, कोणी अंतरवलीला येऊ नका. मराठा बांधवांनी आपल्या जिल्ह्यात तयारी करा. मीच तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला भेटायला येतोयं. आमरण उपोषण केल्यानंतर माझ्या अंगात आग होत असून अंग थरथऱ कापतं आहे. तुम्ही अंतरवलीला न आल्यास मला आराम मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही येऊ नका. येऊ नका म्हणजे नाराज करीत नाही तर हे दिवस शेतात काम करण्याचे आहेत. काम करुन तुम्ही घराघरांत जाऊन तुम्ही तयारी करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांचा मागील 10 महिन्यांपासून लढा सुरु आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण होण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलायं. मात्र, राज्य सरकार मागणी मान्य करेल असं वाटत नसल्याने आम्ही आता ताकदीनेच उठाव करणार आहोत, मंत्री शंभूराज देसाईंच्या शब्दाखातर आम्ही 13 जुलैपर्यंत वाट पाहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी क्लिअर सांगितलंय.

मराठा बांधवांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी सातत्याने लावून धरलीयं. तर दुसरीकडे ओबीसी बांधवांकडून त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला जात आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन आणि मागणी करण्याचा अधिकार आहे. आमचं नाराज असल्याचं कारण नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

follow us

वेब स्टोरीज