Maratha Reservation : मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणं मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटी गावात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मात्र, मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी सांगितलं.
India-Canada वादानंतर भारतीयांनी फिरवली पाठ; नमलेले टुड्रो देणार 5 लाख नागरिकांना प्रवेश
आज टीव्ही ९ मराठीशी बोलतांना सावंत यांनी सांगितलं की, मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. महाराष्ट्रात जाती व्यवस्था ही कामाचं स्वरुपानुसार ठरली आहे. मातीचं काम करतो, तो कुंभार, सुतार काम करतो तो सुतार. तसं शेती कसं तो कुणबी. छत्रपती शिवाजी महाराजांची जे काही पत्र मिळाली, त्यात पत्रांत कुणबी असा उल्लेक अनेक ठिकाी मिळतो. हा कुणबी म्हणजे, शेतकरी. संत तुकारामांनीही कुणबी असा स्वत:चा उल्लेख केला. शिवाजी महाराजंवरील जे पोवाडे आहेत, त्यातही त्यांचा उल्लेख कुणबी असाच आहे, असं सावंत म्हणाले.
ते म्हणाले, ब्रिटीश आल्यांनंतर जातीची जनगणना झाली. त्या जात जनगणनेचे तपशील पाहिले तर त्यात कुणबी आणि मराठा हे एकच असल्याचं दिसतं. ते एकाच जातीत समाविष्ट केले गेलेत. त्यावरूनही लक्षात येतं की, मुळात मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे नाहीत आणि वास्तव देखील तेच आहे. शिवकाळापासून मराठा आणि कुणबी यांत बेटी व्यवहार होतात. जात वेगवेगळी असेल तर बेटी व्यवहार होत नाहीत. मात्र, कुणबी आणि मराठ्यांत बेटी व्यवहार झाले आहेत. याचा अर्थ मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं सावंत म्हणाले.
सावंत म्हणाले, मराठा आणि कुणबी हे दोन्ही जुने शब्द आहेत. इतिहासतज्ञ के बी देशमुख यांच्या जातवार क्षत्रियांचा सचित्र इतिहास या पुस्तकात या कुणबी आणि मराठा शब्दांची उत्पत्ती दिली. त्यांनी गॅझेटमधील जुने संदर्भ घेऊन सविस्तर मांडणी केली आहे. कुणबी आणि मराठा हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. मराठा इज इक्वल टू कुणबी असं, म्हटलं तर वावंग ठरू नये.
दरम्यान, निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल सरकारने स्वीकारला असून सध्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुरावे पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जरांगे पाटील हे सरसकट आरक्षण द्यावं, या मागणीवर ठाम आहेत.