Download App

जरांगेंनी फोडला भुजबळांचा हुकमी एक्का; गोळाबेरीज करताना होणार दमछाक

  • Written By: Last Updated:

नाशिक : एकीकडे मराठा आरक्षाणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) रान पेटवलं असून, हे आरक्षण कसं देता येईल किंवा यातून काय मार्ग काढता येईल यावर सत्ताधारी कोंडीत सापडलेले असतानाच आता जरांगे पाटलांनी सत्ताधारी पक्षात असलेलेम मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा हुकमी एक्का फोडला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर (Jaydatta Holkar) यांनी भुजबळांची साथ सोडली असून, होळकर हे भुजबळांचे खंदे समर्थक मानले जातात. होळकरांनी भुजबळांची साथ सोडल्याने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भुजबळांची विधानसभा निवडणुकीत लासलगावसह 46 गावातून मतांची गोळबेरीज करताना चांगलीच दमछाक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राऊतांनाच बेड्या ठोका, त्यांनीच ललित पाटीलला.. शिंदे गटाचा नेता भडकला

जरांगे पाटलांच्या नादी लागणं भोवलं?

दुसरीकडे जरांगे पाटलांनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आमचा त्याला विरोध नाही. पण ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नये. त्याला आमचा विरोध राहील, असे भुजबळांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यांचा हा विरोध भुजबळांना चांगलाच अंगलट आला असून, या मुद्द्यावरून आता मराठा पदाधिकाऱ्यांनी बंडाचं हत्यार उपसण्यास सुरूवात केल्याचे दिसू लागले आहे.

मतांची गोळाबेरीज करताना होणार दमछाक

होळकर यांनी भुजबळांची साथ सोडल्याने येणाऱ्या काळात मतांची गोळाबेरीज करताना भुजबळांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, होळकर हे राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस असून, मराठा आरक्षणाला भुजबळ विरोध करत असल्याने आपण या पदाचाही राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय त्यांनी निफाड तालुका पूर्व 46 गाव तालुकाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लासलगावसह 46 गावातून मतांची गोळबेरीज करताना होणार भुजबळांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कंत्राटी भरती GR बाबत वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा; अजितदादाही टार्गेट

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत होळकरांची भूमिका महत्त्वाची

एकीकडे होळकरांनी साथ सोडल्याने भुजबळांची डोकेदुखी वाढली असून, 2020 मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयदत्त होळकर यांची मोलाची भूमिका बजावली होती. या निवडणुकीत भाजपला एकही खात उघडता आलं नव्हतं तर, होळकरांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे  मविआला दणदणीत विजय मिळवता आला होता. मात्र, आता होळकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची साथ सोडण्याचा आणि पुढे फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका आपण घेतल्याचे होळकरांनी म्हटले आहे.

तोपर्यंत काम करत राहणार

होळकर यांनी साथ सोडल्याने एकीकडे भुजबळांची दमछाक होणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच यावर भुजबळांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, काही लोक आहेत त्यांचे प्रत्येकाचे कारण वेगळे आहे. मात्र, साथ सोडताना मराठा आरक्षण हे कारण दाखवले जात आहे. येणाऱ्या काळात zp निवडणूक आहेत, तिथे काही उमेदवार निवडून आलेत मग आपले काय होणार? याची काळजी असते. भुजबळ शिवसेना, भाजप यांच्या बरोबर आपले पुढे काय होणार याची काळजी अनेकांना असते त्यामुळे काही जण असे निर्णय घेतात. परंतु, येवला आणि लालसलगावची जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करत राहणार असल्याचा विश्वास यावेळी भुजबळांनी व्यक्त केला.

follow us