मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषणासाठी सकाळी 9 वाजता कूच करणार आहेत. या आंदोलनाला मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगेंनी केले असून, आज (दि.28) या आंदोलनासाठी जरांगेंनी त्यांचा मुंबईत धडकण्याचा ‘रूट’ मॅप जाहीर केला आहे. मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे मुंबईकडे कुच करणाऱ्या जरांगेंसह आंदोलकांना 20 जानेवारीपूर्वीच थांबवणे हे मोठे आव्हान राज्य सरकारवर असणार आहे. यासाठी सरकार पाच कलमी उपाय योजना राबवू शकते त्या नेमक्या कोणत्या हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. (Five Options To Stop Manoj Jarange In Front Of Shinde Government)
Priyanka Gandhi यांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रींगप्रकरणी इडी चार्जशीटमध्ये आलं नाव
1. पुन्हा करणार मनधरणी
आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र, जरांगे मुंबईत दाखल होऊ नये यासाठी सरकारकडून जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले तर, त्यांना तेथून हलवण्याचे मोठे आव्हान सरकार आणि पोलीस प्रशासनासमोर उभे राहू शकते. यासाठी मनधरणी यशस्वी न झाल्यास सरकारकडून रोड बंद करणे, रेल्वे बंद करणं अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा सरकारकडून घेतला जाऊ शकतो.
2. वाढता कोरोना आणि जमावबंदीचे आदेश
मनधरणी करून जरांगेंचा रूट मार्च रद्द करायला लावणे हा पहिला प्रयोग सरकारकडून केला जाऊ शकतो. त्यातून मार्ग न निघाल्यास रस्ते, रेल्वे बंद करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला जाऊ शकतो. त्याशिवाय सध्या देशासह राज्यात पुन्हा कोरोनाने डोके काढले आहे. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून कोरोनाची रूग्णसंख्या वाढू न देण्यासाठी सरकारकडून जमावबंदीचे आदेश लागू करून आंदोलकांना एकत्र येण्यास मज्जाव केला जाऊ शकतात.
…म्हणून पवार महाराष्ट्राचं नेतृत्व; कौतुकाचा वर्षाव करत गडकरींनी उलगडलं गुपित
3. राम मंदिर अन् भावनिक आवाहन
वरील दोन पर्यायांशिवाय राज्य सराककडून जरांगेंना भावनिक साददेखील घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यामळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. त्याला कशाला गालबोट लावता अशी भावनिक साद घालून जरांगेंना रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
4. रूटमार्चपूर्वीच स्थानबद्ध करणार
वरील तिन्ही पर्याय यशस्वी न झाल्यास सराकारकडून त्याहून अधिकचा आक्रमक पवित्रा अवलंबला जाभ शकतो. यात मुंबईला निघण्यापूर्वीच जरांगेंना स्थानबद्ध करण्याचा विचार सरकारी पातळीवर केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलीस परवानगीशिवाय जरांगेंना कुठेही जाता येणार नाही.
Maratha Reservation : गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही; जरांगे पाटीलही ‘आरपार’च्या भूमिकेत
5. आयोगाचा अहवाल अन् विशेष अधिवेशन
जरांगेंना रोखण्यासाठी वरील चार पर्यायांशिवाय सरकारकडून चर्चेच गुऱ्हाळ करत वेळपणा काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यात आरक्षण देण्यासाठी काम सुरू आहे. त्याशिवाय राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारण्यात आली आहे. त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. ही आणि अन्य कारणं जरांगेंसमोर ठेवत फेब्रुवारी 2024 मध्ये बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनापर्यंत सरकारकडून वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
कसा आहे जरांगेंनी जाहीर केलेला रूट
20 जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी कूच करणार आहेत. त्यासाठी आज (दि.28) त्यांनी या संबंधीचा रूट कसा असेल याबाबत माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील म्हणाले की, 20 जानेवारीला सकाळी 9 अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलक जालना, शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, सुपा, शिरुर, वाघोली, पुणे, पुणे-मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदान अशा मार्गाने मुंबईत पोहोचणार आहे.