Manoj Jarange Patil Warns State Government : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. दिंडी सुरू होण्यााआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला. मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा सरकारने करू नये. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा (Maratha Reservation) अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. संविधान हातात घेऊ नये. यावर मार्ग कसा काढता येईल हे सरकारने पहावे. आमच्या नोंदी आता सापडल्या आहेत. आणखी दोन दिवस वाट पाहणार आहोत अन्यथा आमच्या गावात यायचं नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना दिला.
आम्ही रस्त्याने कमी दिसत असलो तरीही 26 जानेवारीला मराठे मुंबईतून माघारी येणार नाहीत. प्रत्येक गल्लीत मराठे असतील. परत कुणाला पाठवणार असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. मुंबईला जाईपयर्यंत तुम्ही निर्णय घ्या. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. परंतु, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही यावर सरकारही ठाम असल्याचं दिसत आहे. कारण कुणबी नोंदी सापडलेल्या असतानाही जर आरक्षण दिलं जात नसेल तर मराठ्यांची काय ताकद आहे हे त्यांना बघायचं असेल असे जरांगे पाटील म्हणले.
Manoj Jarange : अल्टिमेटम संपला! आज मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार; प्रशासनही अलर्ट
जर नोंदीच नसत्या तर मराठ्यांना दोनशे वर्षही आरक्षण दिलं नसतं. फक्त आंदोलन करायचं इतकंच समाजाच्या वाट्याला आलं असतं. पण आता नोंदी सापडल्याने त्यांना सुद्धा काही करता येत नाही. याआधी आम्ही सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला आणखी किती वेळ दिला पाहिजे, मराठा समाजाची यात काय चूक असे सवाल करत आणखी दोन दिवस वाट पाहू अन्यथा त्यांनी देखील आमच्या गावात येऊ नये.